1. बातम्या

CNG-PNG च्या किमती पुन्हा मोठी कपात, गौतम अदानी यांची मोठी घोषणा..

गौतम अदानी समूहाची उपकंपनी असलेल्या अदानी टोटल गॅसने घरगुती पीएनजी आणि सीएनजीच्या दरात कपात केली आहे. अदानी टोटल गॅसने जारी केलेल्या निवेदनानुसार, पीएनजीच्या किमतीत प्रति एससीएम ₹ 3.20 आणि सीएनजीच्या किमतीत ₹ 4.7 प्रति किलो सूट देण्यात आली आहे. यापूर्वी महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी केल्या होत्या.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
reduction in CNG-PNG prices

reduction in CNG-PNG prices

गौतम अदानी समूहाची उपकंपनी असलेल्या अदानी टोटल गॅसने घरगुती पीएनजी आणि सीएनजीच्या दरात कपात केली आहे. अदानी टोटल गॅसने जारी केलेल्या निवेदनानुसार, पीएनजीच्या किमतीत प्रति एससीएम ₹ 3.20 आणि सीएनजीच्या किमतीत ₹ 4.7 प्रति किलो सूट देण्यात आली आहे. यापूर्वी महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी केल्या होत्या.

कंपनीने पीएनजीची किंमत 4 रुपये प्रति घनमीटरने कमी करून 48.50 रुपये केली आहे. त्याचवेळी, सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपयांनी कपात करून 80 रुपये प्रति किलो झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, तेल मंत्रालयाने शहर गॅस ऑपरेटरना घरगुती उत्पादित गॅसचे वाटप वाढवण्याच्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा केली. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला होता.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वाढीव वाटप देशभरातील घरांना ऑटोमोबाईल्स आणि पाइप्ड एलपीजीद्वारे सीएनजी पुरवठ्याच्या 94% मागणी पूर्ण करेल. तेल मंत्रालयाने या महिन्याच्या सुरुवातीलाच शहरातील गॅस ऑपरेटर्सना स्थानिक पातळीवर उत्पादित गॅसचे वाटप वाढविण्याच्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा केली आहे. अनेकांनी याबाबत मागणी केली होती.

'गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी'

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वाढलेले वाटप हे देशभरातील घरांमध्ये ऑटोमोबाईल आणि पाईपने एलपीजी पुरवठ्यासाठी सीएनजी पुरवठ्याची 94 टक्के मागणी पूर्ण करेल. गेलात काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्याला मिळाले एकरी 2 कोटी 80 लाख, रोडच्या भूसंपादनासाठी मोठी रक्कम अदा..
राहुल, इथंपण तू मला अडवणार का? अजितदादांनी राहुल कुल यांना केला प्रश्न..
'शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान न देणारे भिकारी सरकार'

English Summary: Big reduction in CNG-PNG prices again, Gautam Adani's big announcement.. Published on: 19 August 2022, 10:26 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters