1. बातम्या

आता वाढीव वीज बिलाची कटकटच मिटली! जेवढे पैसे भराल तेवढीच वीज मिळणार

सध्या महावितरणबाबत अनेक तक्रारी आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असे असताना आता त्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या वीज मीटरचे बिल दर महिन्याला तयार होत असते. त्याचा भरणा ग्राहकांनी ठरलेल्या वेळेत न झाल्यास वीज कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढतो. ही अडचण सोडविण्यासाठी आता स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. प्रीपेड मीटर लावल्याने वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
get electricity as much as you pay

get electricity as much as you pay

सध्या महावितरणबाबत अनेक तक्रारी आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असे असताना आता त्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या वीज मीटरचे बिल दर महिन्याला तयार होत असते. त्याचा भरणा ग्राहकांनी ठरलेल्या वेळेत न झाल्यास वीज कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढतो. ही अडचण सोडविण्यासाठी आता स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. प्रीपेड मीटर लावल्याने वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

आता घरगुती वीज ग्राहकांना ऊर्जा कंपनीकडून लवकरच स्मार्ट मीटर मिळणार आहे. यामुळे जेवढे पैसे भराल तेवढीच वीज मिळणार आहे. मोबाइल सीम कार्डप्रमाणे हे स्मार्ट मीटर पोस्टपेड आणि प्रीपेडमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे ग्राहकांना जेवढा वीज वापर असेल तेवढे बिल अदा करावे लागणार आहे. याबाबतच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे.

सुरुवातीला मुंबई, पुणे व अन्य मेट्रोसिटीत हे मीटर बसविण्यास सुरुवात झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. पुढे राज्यात सगळीकडे हे राबवले जाणार आहे. जसे आपल्याला महिन्याला कॉलिंग किंवा डेटा वापरण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागतो. त्यानंतर ठरावीक दिवसांपर्यंत किंवा तुमच्या वापरानुसार रिचार्ज सुरू राहते.

शेतकऱ्याला मिळाले एकरी 2 कोटी 80 लाख, रोडच्या भूसंपादनासाठी मोठी रक्कम अदा..

त्यानंतर संपते, तसेच वीज बिल प्रीपेड मीटरबाबत असणार आहे. या प्रीपेड वीज मीटरला आधी रिचार्ज करावे लागेल, त्यानुसार तुमच्या वापरानुसार पैशांची कपात होत राहणार आहे. यामुळे हे फायदेशीर ठरणार आहे. जानेवारीनंतर सोलापुरात स्मार्ट मीटर बसवणार आहे. सध्या स्मार्ट मीटरच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लवकरच ती पूर्ण होईल.

CNG-PNG च्या किमती पुन्हा मोठी कपात, गौतम अदानी यांची मोठी घोषणा..

प्रीपेड मीटर लावल्याने वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे, अशी आशा महावितरणने व्यक्त केली आहे. महावितरण अनेक संकटांचा सामना करत आहे. यामुळे याचा फटका अनेकदा सरकारला बसतो. सुरुवातील घरगुती ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या;
65 हजार पगार असणाऱ्या RTO अधिकाऱ्याची संपत्ती बघून डोळे होतील पांढरे, 6 घरे, सिनेमा हॉल, रोख रक्कम, सोनं..
'जशा मुली 'बॉयफ्रेंड' बदलतात तसे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नवा पार्टनर निवडला आहे'
तरुणांनो मोठ्या प्रमाणावर दारू प्या!! सरकारनेच केले आवाहन, वाचा काय आहे कारण...

English Summary: increased electricity bill solved! get electricity as much as you pay Published on: 19 August 2022, 06:04 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters