बदलत्या हवामानानुसार शेती व्यवस्थापन आणि त्यांचे योग्यरीत्या नियोजन करणे गरजेच आहे. शेती व्यवसायात ऋतूनुसार पिकांचे उत्पादन होत असते मात्र बऱ्याचदा आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास काहीच अंदाज नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित तर बिघडतेच शिवाय शारीरिक श्रम देखील वाया जाते. अशावेळी आपत्कालीन पीक नियोजन व व्यवस्थापन पिकांचे संरक्षण करण्यास पात्र ठरू शकते.
हवामान बदल्यास बऱ्याचदा पाऊसाचे प्रमाण कमी होते तर कधी कधी पाऊसाची सुरुवात ही उशिरा होते. त्यामुळे जमिनीतील अपुऱ्या ओलाव्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट होताना दिसते. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खरीप ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल यांसारखी पिके घ्यावीत. महाराष्टात हवामान, माती यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पिके घेतली जातात.
मराठवाडा विभागात पाऊस लांबल्यास आपत्कालीन परिस्थीतीत बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी + धने. कापूस ज्वारी, भुईमूग आणि रागी. रब्बी ज्वारी, करडई आणि सूर्यफूल, हरभरा, जवस आणि गहू,रब्बी गहू, हरभरा,आणि सूर्यफूल या पिकांना प्राधान्य द्यावे. पश्चिम महाराष्ट्र व खानदेश विभाग पाऊस लांबल्यास येणाऱ्या आपत्कालीन परिस्थीत सुर्यफूल, राळ, भुईमूग, एरंडी, तूर, हुलगा, आंतरपीक - बाजरी, सूर्यफूल + तूर, एरंडी + गवार, दोडका मिश्र पीक, रब्बी ज्वारी. या पिकांना प्राधान्य द्यावे.
विदर्भ विभागात जर पावसाळा पाच आठवड्यांपेक्षा जास्त उशिराने सुरू झाल्यास काय करावे? कपाशीची पेरणी करताना केवळ देशी कपाशीचे सरळ सुधारित वाण वापरावेत. २५ ते ३० टक्के बियाणांचा अधिक वापरून पेरणी करावी. तसेच कपाशीच्या ओळींची संख्या नेहमीपेक्षा कमी करून १ किंवा २ ओळी तुरीच्या घ्याव्यात. मूग व उडीद यांसारख्या पिकांची पेरणी करू नये.
ज्वारीची पेरणी शक्यतो करू नये. आणि जर काही क्षेत्रावर ज्वारी घेयची असेल तर बियाणांचा दर ३० टक्क्यांनी वाढवावा. ज्वारीमध्ये होणाऱ्या खोड माशीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पूर्वनियोजन ठेवावे. ज्वारीमध्ये तीन किंवा सहा ओळीनंतर तुरीचे पीक घेतल्यास हंगामाची जोखीम कमी होते. २५ जुलैपर्यंतच सोयाबीन पिकाची पेरणी करावी सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेणे फायदेशीर ठरू शकते. शिवाय या आपत्कालीन परिस्थीत सोयाबीनच्या ओळींची संख्या देखील कमी करावी. याव्यतिरिक्त दापोग पद्धतीने रोपे तयार करणे फायद्याचे ठरू शकते व ज्या ठिकाणी रोपे उपलब्ध नसतील अशा ठिकाणी रोहू पद्धतीने बियाणास मोड आणून चिखलात बियाणे फोकून पेरणी करावी.
पीक उत्पादनातील जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरू शकते. कोरडवाहू शेतीसाठी आपत्कालीन पीक नियोजनासाठी तालुकास्तरावरील तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधून अधिक व माहितीपूर्ण माहिती मिळण्यास मदत होईल.
महत्वाच्या बातम्या;
पोस्ट ऑफिस बचत योजनेत 333 रुपयांच्या गुंतवणुकीवर 16 लाख मिळवा, जाणून घ्या होईल फायदा..
महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची सेंद्रिय शेती मार्गदर्शनासाठी पंजाबवारी, शेतकऱ्यांना होणार फायदा...
उकाडा वाढणार! या आठवड्यामध्ये पुन्हा येणार उष्णतेची लाट, एप्रिल महिना ही तापणार
Share your comments