देशासह राज्यांतर्गत तरुणाईला व्यावसायिक शेतीचे शिक्षण, कालसुसंगत कृषि आणि तत्सम क्षेत्रातील संशोधन यासह शाश्वत ग्रामविकासासाठी एकात्मिक विस्तार शिक्षण प्रणालीच्या प्रभावी वापरातून सुजलाम सुफलाम देश घडविण्याचे कार्य कृषि विद्यापीठाकडून होत आहे.महाराष्ट्र राज्यात एकूण चार कृषी विद्यापीठे सेवारत असून शेतकरी, शासकीय अधिकारी, कृषि शास्त्रज्ञ,
विविध विभाग आणि महत्वाचे म्हणजे राज्यकर्ते, राज्यशासन यांमधील समन्वय अधिक घट्ट करीत कृषि विद्यापीठे खऱ्या अर्थाने समाजाभीमुख करण्यासाठी शेतकरी,शास्त्रज्ञ आणि विधानसभा तथा विधान परिषद आदी विविध प्रवर्गातून सदस्यांची निवड विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर मा. राज्यपाल यांचे मान्यतेने होत असते.On the University Executive Council Hon. It is done with the approval of the Governor.
याच अंतर्गत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कार्यरत असलेले भारतीय कृषी वैज्ञानिक भरती मंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ *डॉ.चारुदत्त मायी* यांचा सदस्य पदाचा कार्यकाळ दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात आला असून त्यांचे जागी विद्यापीठाचे भूतपूर्व
संचालक विस्तार शिक्षण *डॉ. विजय माहोरकर* यांची नियुक्ती झाली तर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील राज्यपाल नियुक्त कार्यकारी परिषद सदस्य तथा स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे माजी कुलगुरू *डॉ. बी वेंकटेश्ववरलू* यांचा सुद्धा
सदस्यत्वाचा कालावधी 29 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात आला असून त्यांचे जागेवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला तथा स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे भूतपूर्व संचालक विस्तार शिक्षण *डॉ. प्रदीप इंगोले* यांची निवड मा.राज्यपाल कार्यालयाद्वारे करण्यात आली आहे.
आपल्या कर्तव्यतत्परतेसाठी आणि सचोटीसाठी सर्वदूर सुप्रसिद्ध असलेल्या या दोनही कृषि शास्त्रज्ञाच्या नियुक्तीने अकोला कृषि विद्यापीठ परिवारात आनंदाचे तथा उत्साहाचे वातावरण आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी नवनियुक्त विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य डॉ.विजय माहोरकर तथा डॉ. प्रदीप इंगोले यांचे विद्यापीठ परिवाराचे वतीने हार्दिक अभिनंदन केले आहे.
Share your comments