जळगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे राजकीय वैर सर्वांना माहिती आहे. अनेकदा निवडणुकीत ते एकमेकांसमोर आव्हान देत असतात. खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर याबाबत अनेकदा त्यांनी महाजन यांच्यावर टीका केली आहे.
असे असताना आता जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. यामुळे संचालक मंडळ बाजूला करीत प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. यामुळे खडसे गटाला मोठा धक्का बसला होता.
यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या गटातील मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांची वर्णी याठिकाणी लागली होती. यामुळे हा वाद कोर्टात गेला होता. एकनाथराव खडसे गटाकडून काही संचालकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
गोकुळ दूध संघाची सभा ठरली वादळी! सतेज पाटील, हसन मुश्रीफांना भिडल्या शौमिका महाडिक..
यामुळे याबाबत निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता खंडपीठाने निकाल दिला असून प्रशासक मंडळ बाजूला सारत पुन्हा संचालक मंडळ कायम केले आहे. यामुळे महाजन यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! पुरंदरमध्येच होणार विमानतळ, शिंदे- फडणवीस सरकारने दिले महत्त्वाचे निर्देश
LED bulb; वीज गेल्यावर ४ तास लाइटिंग बॅकअप देतो 'हा' LED ब्लब, किंमत फक्त..
कारखाने कसे विकत घेतले? आयकरची धाड पडलेल्या अभिजित पाटलांनी केला मोठा खुलासा
Share your comments