1. पशुधन

बातमी शेतकऱ्यांसाठी! म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा...

शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत असताना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Milk Producing Farmers) म्‍हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये एक ऑगस्ट २०२२ पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Increase purchase price of buffalo and cow milk

Increase purchase price of buffalo and cow milk

शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत असताना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Milk Producing Farmers) म्‍हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये एक ऑगस्ट २०२२ पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आता म्हैस दुधासाठी (Buffalo Milk) प्रतिलिटर २ रुपये व गाय दुधासाठी (Cow Milk) प्रतिलिटर १ रुपये वाढ केली आहे. गोकुळच्या संचालक मंडळाच्‍या मिटिंगमध्‍ये हा निर्णय घेण्‍यात आला आहे, अशी माहिती संघाचे अध्‍यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिली. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात आले आहेत.

आता उद्यापासून मुंबईत म्हशीच्या एक लीटर दुधासाठी 66 रुपये मोजावे लागतील. आधी म्हशीचे दूध प्रतिलीटर 64 रुपये होता. या वाढीव दराचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. असे असताना मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील. असे असताना गोकुळने दरवाढ केली असली तर इतर दूध संघांनी ही दरवाढ केलेले नाही. त्यामुळं इतर दूध संघाचे दुधाचे दर तेच राहतील.

शेतकऱ्यांनो गाजर गवताचा करा कायमचा नायनाट, जाणून घ्या सोप्पी पद्धत..

ही दरवाढ फक्त गोकुळ दूध संघाने ही दरवाढ केली आहे. त्यामुळे फक्त गोकुळच्या दूध दरात वाढ झाली आहे. जनावरांच्या खाद्यात वाढ झाली. खाद्याचा खर्च हा जास्त झाला. त्यामुळं ही दरवाढ करणे आवश्यक आहे. कारण दुधासाठी पशूंना चांगले खाद्य द्यावे लागते. दूध उत्पादकांना भाववाढ होण्याची मागणी अनेकांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो आता जुनी विहिरींच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये मिळणार, असा घ्या लाभ...
शेतकऱ्यांनो आता जुनी विहिरींच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये मिळणार, असा घ्या लाभ...
राज्यातील बड्या राजकीय नेत्यांना धक्का, साखर आयुक्तांनी पैसे थकवल्याप्रकरणी दिल्या नोटीस..

English Summary: farmers! Increase purchase price of buffalo and cow milk Published on: 02 August 2022, 10:57 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters