1. बातम्या

पुढील दहा दिवसात अंड्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झेलावे लागले आहे आणि त्यामध्ये अजून कुक्कुटपालन मध्ये त्यांची चिंता वाढलेली आहे. यावेळी बाजारात पाहायला गेले तर अंडी आणि चिकन चा पुरवठा कमीच असल्याचे दिसून येत आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
eggs

eggs

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झेलावे लागले आहे आणि त्यामध्ये अजून कुक्कुटपालन मध्ये त्यांची चिंता वाढलेली आहे. यावेळी बाजारात पाहायला गेले तर अंडी(eggs) आणि चिकन चा पुरवठा कमीच असल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांमध्ये एक वेगळीच निराशा दिसत आहे:

केंद्र सरकारने सोयाबीन च्या वाढत्या किमतीत परिणाम पाहता सुमारे १.५ दशलक्ष टन एवढे सोयाबीन आयात केले आहे तरी सुद्धा पोल्ट्री  उत्पादक  शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढलेली दिसून येत आहे.या महिनेच्या अखेर पर्यंत अंडी आणि चिकन च्या किमतीत २५ ते ३० टक्यांनी वाढ होईल असा  अंदाज वर्तवला  गेला आहे मात्र यासाठी लागणारे धान्य च्या किमतीत सुद्धा वाढ झाली असल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांमध्ये एक वेगळीच निराशा दिसत आहे. श्रावण महिन्यात  सुद्धा अंडी व चिकन च्या किमतीत कसलीच घट झालेली नाही जो की अंड्याचा भाव प्रति शेकडा ४०० ते ५०० रुपये आहे.

हेही वाचा:तुमचे खाते PNB मध्ये असेल तर तुम्हाला मिळेल 2 लाखांचा लाभ; कसे ते जाणून घ्या

या कारणामुळे किंमती वाढण्याची शक्यता:-

  • सध्या बाजारात पाहायला गेले तर चिकन चा भाव प्रति किलो १०० रुपये आहे मात्र कोंबड्यानं खाण्यासाठी जे धान्य लागते त्या धान्याच्या किमतीमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येते त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा वाढलेला दिसून येत असल्याचे चित्र समोर दिसत आहे.
  •  सध्याच्या बाजारात जर तुम्ही नजर टाकली तर तज्ञ वर्ग असा सांगत आहे की चिकन व अंड्याचा पुरवठा पुरवठा मागणीपेक्षा २० टक्याने कमीच झालेला दिसून येत आहे. मात्र या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच पुढील दहा दिवसांत अंडी व चिकनचा पुरवठा २५ ते ३० टक्याने वाढू शकतो.
  • उत्तर प्रदेश राज्यातील पोल्ट्री फार्म असोसिएशनचे अध्यक्ष नबाब अली अकबर यांनी टीव्ही 9 या चॅनेल असे सांगितले आहे की केंद्र सरकारने जरी घोषणा दिली तरीही त्यानंतर एक ते दीड महिन्याने सोयमिल येईल.
  • सध्या आपण जर बाजारात गेलो तर धान्याच्या किमती मध्ये ४० टक्यांनी वाढ झालेली दिसून येत आहे मात्र त्या तुलनेत पाहायला गेले तर सोयाबीन च्या किमतीमध्ये सुद्धा ३ पटीने वाढ झालेली दिसून येत आहे जसे की सोयाबीन ची किमंत प्रति क्विंटल ३५०० ते १०००० रुपये पर्यंत पोहचलेली आहे. शेतकरी वर्ग सध्या याच किंमतीवर आपले उत्पन्न वाढविण्यासाठी अवलंबून आहे.
  • अली अकबर यांनी असे सांगितले आहे की वाढती मागणी पाहून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब मध्ये कुक्कुटपालन सुरू केले आहे.
  • नव्या कोंबड्या अंडी तर देतील मात्र त्याचे वजन कमी असणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला योग्य अशी किमंत आजिबात भेटू शकणार नाही. योग्य किमंत तेव्हाच भेटेल ज्यावेळी त्याचे वजन होईल.
English Summary: Egg prices are likely to rise in the next ten days Published on: 20 August 2021, 02:18 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters