शैक्षणिक सहलीचे दिवस म्हणजे सहलीला जाणे हा अत्यंत औत्सुक्याचा भाग असतो, अशा शालेय आणि महाविद्यालयाच्या सहली आयुष्यभर आठवणीत राहणाऱ्या असतात.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय अकोला येथील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन दिनांक 22
ते 24 सप्टेंबर दरम्याण करण्यात आले आहे. 22 सप्टेंबर रोजी सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रकाश नागरे व वनस्पती रोग शास्त्र तज्ञ डॉ एम व्ही तोटावार यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवत कृषी महाविद्यालय अकोला च्या शैक्षणिक सहलीचे मार्गक्रमण करण्यात आले.
हे ही वाचा - हळद –आले कंदकुज रोगाचे करा वेळीच आणि अशाप्रकारे नियोजन
An educational trip to Akola was planned. त्यावेळी सहल प्रमुख डॉ. गिरीश जेऊघाले व
सहाय्यक डॉ. संजय कोकाटे आणि सहलीला जाणारे विद्यार्थी उपस्थीत होते. त्यावेळी महाविद्यालयातील बाकी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहलीला जाणाऱ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे, विशेष म्हणजे आवडीचे शिक्षक
सोबत असल्याने तोच आनंद द्विगुणित झाला आहे.विद्यार्थ्याचे शैक्षणिक, औद्यागिक, संशोधनात्मक तसेच संवाद कौशल्य व बाजार व्यवस्थापन याबाबतचे ज्ञान वृंघ्दिगत होण्यासाठी शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणुन महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे, कृषी कंपन्या, कृषी विज्ञान केंद्रे, ऐतिहासिक स्थळे यांना भेटी देणार आहे.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments