1. बातम्या

दिलासादायक बातमी! खाद्यतेलाच्या किमती पुढील पंधरवड्यापासून कमी होण्यास होईल सुरुवात

खाद्य तेलाच्या किमतींना मागील बऱ्याच महिन्यांपासून सर्वसामान्यांचे आर्थिक गणितच बिघडवून टाकले आहे. आता जर सोयाबीन तेलाचा भाव पाहिला तर तो 180 रुपये किलो आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
edible oil prices can decrease in coming next few days

edible oil prices can decrease in coming next few days

 खाद्य तेलाच्या किमतींना मागील बऱ्याच महिन्यांपासून सर्वसामान्यांचे आर्थिक गणितच बिघडवून टाकले आहे. आता जर सोयाबीन तेलाचा भाव पाहिला तर तो 180 रुपये किलो आहे.

 हातावर पोट असणार्‍या लोकांसाठी तर हा भाव खूपच जास्त आहे. परंतु आता  खाद्यतेलाच्या संबंधित दिलासादायक बातमी समोर येत असून ती म्हणजे वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर खाद्य तेलाच्या किमतीत दिलासा मिळण्याचीचिन्हे आहेत. मे किंवा जून च्या शेवटच्या आठवड्यापासून  सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि पामोलीन तेलया तेलाच्या किमती मध्ये घसरण व्हायला सुरुवात होईल.

 खाद्य तेलाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय परिस्थिती(International Situation In International Market)

 गेल्या दोन महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सर्व खाद्य तेलाच्या किमती 400 ते 600 डॉलर प्रति टन म्हणजे 31 ते 46 रुपये प्रति किलो वाढले आहेत. परंतु मागणी कमी झाल्यामुळे खाद्य तेलाच्या किमती गेल्या आठवड्यात तीन ते पाच टक्क्यांनी घसरले आहेत. याबाबतीत तज्ञांचे मत आहे की हळूहळू ही घसरण वाढत जाईल व त्याचा फायदा भारताला होईल.सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया कार्यकारी संचालक बी.व्ही.मेहता म्हणाले की पुढील महिन्यापासून खाद्यतेलाचा कल बदलेल.

 याचे कारण  असे आहे की इंडोनेशियाला पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी जास्त काळ चालू ठेवता येणार नाही. येत्या काही दिवसात हे निर्बंध उठवले जागेत याशिवाय रशिया आणि अर्जंटीना येथून सूर्यफूल तेलाची खेप येण्यास सुरुवात होईल.

सोयाबीनप्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डीएन पाठक यांनी सांगितले की,इंडोनेशियालानिर्यात उघडण्यास भाग पाडले जाईल पण अन्नसुरक्षेच्या दबाव असेल तर तिथले सरकारहीउशीर करू शकते.तथापी देशातील पुरवठ्याची स्थिती अजूनही चांगली आहे. खाद्य तेलाची मागणी वाढलेल्या किमतीमुळे कमी होऊ लागली आहे याशिवाय पुरवठाही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाच मे पासून भावात किरकोळ घसरण सुरू झाली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पर्यंत देशात सोयाबीन तेलाच्या घाऊक दर पंधरा किलोमागे 2700 रुपये होता तो आता घसरून 2580 रुपये प्रतिकिलो( लिटर)पर्यंत खाली आला आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Scheme For Farmer: 'ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे' हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी ठरेल फायद्याचा , जाणून या योजनेबद्दल सविस्तर

नक्की वाचा:PM kisan: 2 हजार रुपये मिळवण्यासाठी eKYC अनिवार्य, आता घरबसल्या करता येणार eKYC; जाणून घ्या प्रक्रिया

English Summary: edible oil prices can decrease in coming next few days Published on: 18 May 2022, 02:36 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters