1. कृषीपीडिया

वेळीच सावध व्हा! रिफाईन्ड तेल पुन्हा वापरणं पडेल महागात, आरोग्यावर होतो थेट परिणाम.

रिफाईन्ड तेल अगोदरच 300 ते 500 डिग्री अंश सेल्सिअस वर केमिकल प्रोसेस द्वारे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
वेळीच सावध व्हा! रिफाईन्ड तेल पुन्हा वापरणं पडेल महागात, आरोग्यावर होतो थेट परिणाम.

वेळीच सावध व्हा! रिफाईन्ड तेल पुन्हा वापरणं पडेल महागात, आरोग्यावर होतो थेट परिणाम.

रिफाईन्ड तेल अगोदरच 300 ते 500 डिग्री अंश सेल्सिअस वर केमिकल प्रोसेस द्वारे तयार केलेले असते. जेवणासाठी वापरण्यात आलेलं तेल पुन्हा गरम केल्यास त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरात फ्री रेडिकल्सही बनतात, ज्यामुळं सूज येण्यापासून अनेक जुने आजार ओढवले जाण्याचा धोका असतो असं म्हणतात. FSSAI (Food Safety and Standards Authority of India) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकदा वापरलेलं तेल पुन्हा गरम करणं टाळावं. FSSAI (Food Safety and Standards Authority of India) नुसार

तळलेल्या वस्तू वापरल्यानंतर ते तेल फक्त तीन वेळेसच वापरता येऊ शकतं. पण, तज्ज्ञांच्या मते शक्यतो ही बाब टाळावी.

हे ही वाचा - उन्हाळ्यात तर बर्फाचे पाणी पिऊच नका, माठातील पाणी पिणे ठरेल फायदेशीर

               उच्च तापमानावर तापवण्यात आलेलं तेल विषारी धूर सोडतं. वापरलेलं तेल हे गरम होण्यापूर्वीच धूर सोडतं. या तेलातील फॅट मोलेक्युल्स काही अंशी तुटू लागतात. जेव्हा हे तेल स्मोक पॉईंटवर जातं, तेव्हा प्रत्येक वेळी त्याचा वापर केल्या उग्र वास येऊ लागतो. 

अशा वेळी आरोग्यास पदार्थ हवेत आणि अन्नातही मिसळले जातात. 

अस वारंवार कराल तर या रोगांना मिळेल आमंत्रण: तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.

त्यामुळेच, स्पष्ट सांगावयाचे झाल्यास लाकडी घाण्याचे केमिकल विरहित शुद्ध तेलच जे 30 ते 40 डिग्री सेल्सिअस वर निघतात तेच नियमितपणे स्वयंपाक गृहात वापरण्यात यावे जेणेकरून, इतर घातक बिमारी पासून आपण सर्वजण दूर राहू, शेवटी आरोग्य ही खरी संपत्ती आहे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे काही गोष्टींचा त्याग केला पाहिजे त्यासाठी आजपासूनच लाकडे घाणी तेल वापरणे सुरू करूयात आणि आपल्या आयुष्याला आणखी सुंदर बनउयात.

English Summary: Attention timely refined oil repeat use will you loss effect on health Published on: 27 April 2022, 09:47 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters