1. बातम्या

आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी 'महिलांची शेतीशाळा'; उपक्रमाची होतीये राज्यभर चर्चा

कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. काळ्या आईशी स्त्रीचे नाते हे फार जुने आणि तितकेच घट्ट आहे. आज महिला शेती व्यवसायात देखील नाविन्यपूर्ण प्रयोग करून यशाला गवसणी घालत आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
‘क्लायमेट स्मार्ट शेती'

‘क्लायमेट स्मार्ट शेती'

अमरावती : कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. काळ्या आईशी स्त्रीचे नाते हे फार जुने आणि तितकेच घट्ट आहे. आज महिला शेती व्यवसायात देखील नाविन्यपूर्ण प्रयोग करून यशाला गवसणी घालत आहे. अमरावती जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या 'महिलांच्या शेतीशाळा' चा उपक्रम सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खडेश्‍वर, भातकुली तसेच अमरावती तालुक्यांतील काही निवडक गावामध्ये ‘क्लायमेट स्मार्ट शेती कार्यक्रम’ राबवला जात आहे.

आयटीसी ‘मिशन सुनहरा कल’अंतर्गत ‘बायफ’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत जवळजवळ नव्वद गावांत 'महिलांच्या शेतीशाळा' घेतल्या जाणार आहेत. निवडलेल्या गावाला स्वयंपूर्ण बनवणे हाच यामागचा उद्देश आहे. यात प्रामुख्याने महिला बचत गटाच्या उपजीविकेसाठी निवडक बचत गटाला ‘कृषी अवजार बँकेचे’ प्रशिक्षण देणे तसेच काही गटांना कृषी अवजार उपलब्ध करून देणे जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील.

यात आयटीसी मिशन सुनहरा कल आणि बायफ यंत्रनेचा महत्वाचा वाटा आहे. तसेच 'ॲग्री बिझनेस सेंटर' च्या माध्यमातून बियाणे बँक, जैविक खत आणि औषधे तसेच कृषीवर आधारित लघू उद्योग उभे करणे व त्यासाठी त्यासाठी त्यांना याबाबतचे प्रशिक्षण तसेच मार्गदर्शनदेखील दिले जाते. जिल्ह्यातील अनेक बचत गटाला गेल्या काही दिवसांपासून कृषी अवजार बँक केंद्राचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे यातून ७२ कृषी अवजार बँक केंद्र सुरूदेखील झाली आहेत. याचा फायदा असा झाला की, या प्रशिक्षणात सामील असलेल्या महिला आता कुटुंबाला आर्थिक आधार देत आहेत.यंदा अमरावतीत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित खरीप हंगामात ‘महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळा’ राबवण्यात येणार आहेत. शेती व महिला शेतकरी यांना केंद्रीभूत करून भातकुली, नांदगाव आणि अमरावती तालुक्यातील निवडक गावात हा उपक्रम राबवला जात आहे.

महाराष्ट्र दहावी बोर्डाचा असाही एक निकाल; वडील पास तर मुलगा नापास

९० गावात राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात सोयाबीन पिकाच्या बदलत्या हवामानावर आधारित; सुपर चॅम्पियन शेतकऱ्यांच्या डेमो प्लॉटवर पेरणीपासून ते काढणीपर्यंत चे मार्गदर्शन दिले जाणार आहे. जिल्ह्यात प्रथमच आयटीसी प्रकल्पाने सोयाबीन पिकाचे भरघोस उत्पादन यावे यासाठी चांगल्या गुणवत्तेचे बियाणे, बीबीएफ-रुंद सरी वरंबा पद्धतीची पेरणी पद्धतीला सुरुवात केली होती. या प्रकल्पामुळे बराच फायदा झाला असून आज गावागावांत या प्रकल्पाच्या माध्यमातून बियाणे बँक उभारण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:
व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा पर्दाफाश; कोट्यवधींचा माल जप्त,चार जण अटकेत
सांगा शेती कशी करायची? पाच वर्षात पहिल्यांदाच बियाणे व खतांच्या किंमतीत दुप्पट वाढ; शेतकरी हतबल

English Summary: Economically viable 'women's farm'; The initiative was discussed across the state Published on: 20 June 2022, 10:25 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters