1. कृषीपीडिया

हवामान बदल व कृषी.

जागतिक अन्न व्यवस्थेमध्ये वाढत्या कॅलरींच्या मागणीची पूर्तता होत असूनही, या अहवालात असे म्हटले आहे की ८२१ दशलक्ष लोक (जगातील ११टक्के लोक) कुपोषित असून आणि ही संख्या वेगाने वाढत आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
हवामान बदल व कृषी.

हवामान बदल व कृषी.

एमएसपी प्रणाली तर्कसंगत करणे आवश्यक

तिनही कृषी कायदे रद्द की निवडणूक जुमला ?

कृषी शेतकरी गटाचा विषमुक्त सेन्द्रीय शेतीचा वापर

हवामान बदल व कृषी: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक जल विकास अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की हवामान बदलामुळे पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होईल आणि यामुळे जागतिक अन्न उत्पादन क्षमतेत मूलभूत स्वरूप बदलू शकते. अशाप्रकारे, आगामी काळात हवामानातील अगदी लहान बदलदेखील अन्न असुरक्षिततेचे प्रमाण व वितरण प्रणाली वर प्रतिकूल परिणाम होवू शकतो व अन्नधान्याच्या किंमतींमध्ये वाढ आणि ग्रामीण भागातील दारिद्र्य वाढवू शकतात.

 

नॅशनल प्रोसीडिंग ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ अमेरिका

सन २०४० पर्यंत स्थानिक हवामान पध्दतीत बदल झाल्यामुळे गहू, तांदूळ, सोयाबीन आणि मका या चार प्रमुख पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. मे महिन्यात नॅशनल प्रोसीडिंग ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस

अंदाज दर्शवितात की अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील काही भाग आफ्रिकेसह काही कोरडे पडतील तर उष्ण कटिबंधीय आणि उत्तर भागात गारा पडतील. तांदळाच्या लागवडीसाठी वापरल्या जाणा १००टक्के, मक्याच्या ९० टक्के आणि सोयाबीनच्या ८०टक्के जागेवर पुढील ४० वर्षांत पावसाच्या तीव्र वातावरणाचा सामना करावा लागणार आहे. अशा इशारा हा अहवालात नमूद करण्यात आला आहे.

कुपोषित संख्या वेगाने वाढत आहे.

कृषी कार्याचे वाढते दर आणि दिवसेंदिवस वाढणारा धोका आणि हवामानातील बदलामुळे पुढील ५०-१००वर्षे खूप कृषी क्षेत्रासाठी खुप अवघड जात जातील हे हे सिद्ध करते. वाढते तापमान आणि दीर्घकाळात होणारे हवामान बदल हे आगामी काळात अन्न उत्पादनाच्या व अन्नसुरक्षेच्या चिंतेचे मुख्य कारण आव्हाने आहेत.जगातील प्रमुख कृषी पध्दती, मग ती भारतीय उपखंड किंवा उत्तर आफ्रिकेचा प्रदेश असो, सर्व हवामान बदलांमुळे होणार्‍या परिणामास असुरक्षित आहेत.

जागतिक अन्न व्यवस्थेमध्ये वाढत्या कॅलरींच्या मागणीची पूर्तता होत असूनही, या अहवालात असे म्हटले आहे की ८२१ दशलक्ष लोक (जगातील ११टक्के लोक) कुपोषित असून आणि ही संख्या वेगाने वाढत आहे.

शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम

भारतीय उपखंडात हवामान बदलामुळे झालेल्या पावसाच्या वाढीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे

या परिस्थितीला अति तापमान कारणीभूत आहे.

गंगा आणि ब्रह्मपुत्रांशी निगडित बर्फ वितळण्यामुळे पाण्यावर अवलंबून शेती हीच असुरक्षित आहे

ज्यामुळे उत्पन्न घटू शकते. तसेच पूर किंवा दुष्काळाचे प्रमाणही वाढू शकते.

भूगर्भातील पाण्याची कमतरता, भूगर्भातील पाण्याचे प्रमाण कमी होणे,

पावसाळ्याच्या दिवसात वाढ किंवा घट आणि परिणामी पूर परिस्थिती यासारख्या मागील २० वर्षातील बदल

हे हवामान बदलाचे द्योतक आहे व यामुळे कृषीची उत्पादकता कमी होत आहे.

या अहवालात असे म्हटले आहे की, पावसाच्या अस्थिरतेमुळे आणि विशेषत: तीव्रता,

पावसाचा कालावधी आणि वारंवार होणार्‍या पावसाची वारंवारता यामुळे शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे.

टंचाई किंवा पाण्याच्या जास्ततेमुळे हवामान बदलाचा पाणी आणि शेतीवर मोठा परिणाम होतो.

जगातील बर्‍याच भागात पाणीटंचाई हे एक मोठे आव्हान आहे.

शेतीच्या कामकाजासाठी आणि पीक उत्पादनासाठी पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे,

कधीकधी नगदी पीक घेण्याची गरज असते तर कधी मुख्य अन्न पिके घेता येतात.

अहवालात असे म्हटले आहे की हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी पाणी व्यवस्थापनासमोर दुहेरी आव्हान आहे.

जलचक्रात बदल करणे आवश्यक

अहवालानुसार पाणीटंचाई आणि जास्त दुष्काळ आणि पूर परिस्थिती, दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याची उपलब्धता आणि पुराच्या परिस्थितीत पाण्याचा निचरा होण्याशी सामना करण्यासाठी सध्याचे पहिले आव्हान कमी पाण्यावर उत्पन्न होणारे वाण शेतीचा अवलंब करणे आहे. दुसरे आव्हान म्हणजे ग्रीनहाऊस गॅस कमी करून हवामान बदलाची गती कमी करणे.

२०१७ च्या अन्न व कृषी संघटनेचे (एफएओ) दीर्घकालीन अंदाजदेखील समोर आणून ते नमूद केले की, कमी-मध्यम व मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांमध्ये, विशेषत: मध्य पूर्वेतील आणि हवामानातील जोखमीत वाढणार्‍या बदलांद्वारे कॅलरीची मागणी एकाच वेळी वाढेल. परिणामी उत्पादन जोखीमही वाढेल.

अहवालात म्हटले आहे की केवळ पाण्याच्या उपलब्धतेतील चढउतार लक्षात घेतल्यास नियोजन केल्याने कृषी उत्पादनात अपेक्षित परिणाम मिळणार नाही. हवामान बदल थांबविण्यासाठी आणि आवश्यक पावले उचलण्यासाठी पाण्याकडे इतर स्मार्ट मार्गांनी पाहिले पाहिजे. संपूर्ण जलचक्रात बदल अशा प्रकारे आणले जावे जेणेकरुन त्याचा परिणाम कृषी उत्पादनावर सकारात्मक परिणाम होईल आणि ग्रीनहाऊस वायूचे उत्सर्जन कमी होईल.

विकास परसराम मेश्राम 

vikasmeshram04@gmail.com

English Summary: Climate change and agriculture Published on: 28 November 2021, 09:02 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters