डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी दुधापासून विविध पदार्थ बनवत आहेत. शेतकऱ्यांना योग्य भाव न मिळाल्यामुळे त्यांना नैराश्यास सामोरे जावे लागते कधीकधी लागणारा खर्च पण वसुली होत नाही. योग्य ती बाजारपेठ उपलब्ध नसते शेतकऱ्यांचा माला बेभाव विकला जातो. अशा या संकटांना सामोरे जाण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दुधापासून पनीर, खवा,पेढा तसेच श्रीखंड बनवला आहे. कमी खर्चा मध्ये शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला
हा प्रयोग नक्कीच मिळवून देऊ शकतो असे प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी सांगितले..
चतुर्थ वर्षात शिकत असलेले विद्यार्थी जयेश इंगळे,शुभम काकडे, आशुतोष इंगळे,संकेत काळदाते,प्रतीक मावाळ विद्यार्थी या संकल्पनेशी एक जुट झाले व त्यांनी हा प्रयोग करण्यास ठरवले यात त्यांना योग्य तो नफा सुद्धा मिळाला.
एकूण मिळालेला मोबदला खर्च वजा करता त्यांना निव्वळ नफा दुधाच्या किमती पेक्षा जास्त मिळाला.
अशाच प्रकारे शेतकरीसुद्धा हे पदार्थ बनवून बाजारात विकू शकतात.
आयुर्वेदात दुध व दुग्ध पदार्थांचे मानवी आहारात अनन्यसाघारण महत्त्व पटवून देण्यात आले आहे. अनेक वनस्पतींच्या औषधी सारमुत भागापासून दुघ उत्पन्न होते. ते सर्व प्राण्यांना आत्मसात होणारे, पौष्टीक तसेच ओजवर्घक आहे.
नवजातच्या पोषणासाठी व वाढीसाठी लागणारे पाणी, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट हे सर्व अन्नघटक दुधामध्ये संतुलित प्रमाणात आहेत.
या शिवाय जिवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारेदुधामध्ये मुख्यत: केसिन, लॅक्टोअल्बुलीन, लॅक््टोग्लोब्युलीन ही प्रथिने आढळतात. केसीन हे दुघातील मुख्य प्रथिनघटक (८० टक्के) असून ते कॅल्टियम संयुगाच्या स्वरूपात असते. गायीच्या दुधातील प्रथिनांना फ्वन सुलभतेच्या तसेच वाढीच्या दृष्टीने अधिक जैवमुल्य असल्याने ते लहान मुलांना अत्यंत उपयुक्त असे अन्न आहे. शरीराच्या पोषणाकरीता लागणारी सर्व अँमिनोआम्ले योग्य प्रमाणात या प्रथिनात असतात.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments