1. बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ आणि एकोसर्ट (ई अँड एच ) फ्रांस सयुक्तपणे राबविणार “सेंद्रिय प्रमाणीकरण” या विषयामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ आणि एकोसर्ट (ई अँड एच ) फ्रांस सयुक्तपणे राबविणार “सेंद्रिय प्रमाणीकरण” या विषयामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ आणि एकोसर्ट (ई अँड एच ) फ्रांस सयुक्तपणे राबविणार “सेंद्रिय प्रमाणीकरण” या विषयामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला व एकोसर्ट (ई अँड एच ) फ्रांस यांचे सोबत शिक्षण व संशोधन यासाठी सामंजस्य करार झाला असून त्या अंतर्गत “सेंद्रिय प्रमाणीकरण” या विषयामध्ये २०२२-२३ वर्षामध्ये पुढील महिन्यापासून पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करणार आहेत . सदर अभ्यासक्रम हा संपूर्ण रित्या सशुल्क असून एकोसर्ट (ई अँड एच ) फ्रांस आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे . विद्यापीठाद्वारे प्रस्तावित “सेंद्रिय प्रमाणीकरण” पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम हा कृषि अथवा कृषि संलग्नं तथा विज्ञान विषयातील पदवी प्राप्त केल्यानंतर करता येणार आहे, सदर अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक अर्हता ही कृषि अथवा विज्ञान विषयातील पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील.

सदर अभ्यासक्रम हा एक वर्षं कालावधीचा असून, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे सेंद्रिय प्रमाणीकरण या क्षेत्रामद्धे कार्यरत शासकीय, निमशासकीय, आंतर्राष्ट्रीय संस्था तथा खाजगी संस्था यांच्या विविध उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतील. सदर पदविका अभ्यासक्रम हा इंग्रजी माध्यमात असून विद्यापीठातील प्राध्यापक, देशातील नामांकित संस्थामधील विशेषज्ञ आणि एकोसर्ट (ई अँड एच ) फ्रांस यांचे विषय तज्ञ हा अभ्यासक्रम शिकविणार आहेत. सदर अभ्यासक्रम हा अनिवासी असून महिन्यातून दोन किंवा तीन वेळा विद्यापीठ मुख्यालयी शिकविल्या जाणार आहे तर काही तासिका ह्या आभासी पद्धतीद्वारे सुद्धा घेण्यात येतील. सादर अभ्यासक्रमामध्ये ३० वर्ग तासिका आणि ३० प्रात्यक्षिकांच्या तासिका राहतील.The course offered will consist of 30 class hours and 30 practical hours.सदर अभ्यासक्रमास प्रवेश देताना ज्या विद्यार्थ्यानी कृषि तथा संलग्न विषयामधून जास्तीत जास्त गुणांक संपादन केले असतील तसेच इतर विज्ञान विषयामधून

जास्तीत जास्त टक्केवारी प्राप्त केली असेल अशा विद्यार्थ्याची त्यांना प्राप्त झालेले गुणांक किवा टक्केवारी लक्षात घेऊन गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येईल. पदविकेचे शुल्क रु पस्तीस हजार (रु ३५०००/-) असून अर्जं आणि महितीपुस्तिका विद्यापीठाच्या संकेत स्थळावरुन प्राप्त करता येईल. तथापि प्रवेश घेण्यासाठी अर्ज दाखल करताना प्रवेश शुल्काचे रु २५०/- हे डिमांड ड्राफ्ट द्वारे भरावयाचे आहे .विद्यापीठाने या आधी सुद्धा जपान , स्वीत्झर्लंड, नेदरलँड, हंगेरी येथील विविध संस्थांशी सामंजस्य करार करून शिक्षण , संशोधन आणि विस्तार कार्य यामध्ये सयुक्त रित्या उपक्रमांना सुरुवात केली आहे. विद्यापीठद्वारे सन २०१५ मध्ये स्थापन केलेल्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र या द्वारे सदर पदविका कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. देशामध्ये कौशल्य आधारित शिक्षणाला असणार्‍या महत्वामुळे आणि व्यवसायीक अभ्यासक्रमामुळे सदर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे सद्य स्थितीमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रसार बघता तसेच सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय

स्तरावर प्रथमतःच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्‍या संस्थेसोबत करार करून “ सेंद्रिय प्रमाणीकरण “ या विषयामध्ये पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सदर अभ्यासक्रमाबद्दल अतिरिक्त माहिती साठी अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ आदिनाथ पसलावार , सहप्रमुख डॉ नितीन कोंडे (दूरध्वनी क्र ७२४९४८५३७५) तथा समन्वयक डॉ परीक्षित शिंगरूप (दूरध्वनी क्र ७५८८९६२२१५) यांना संपर्क साधावा. विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ विलास भाले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तसेच डॉ विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ एस एस माने, अधिष्ठाता (कृषि ), डॉ डी. बि. उंदिरवाडे, संचालक विस्तार शिक्षण , डॉ एस आर काळबांडे, कुलसचिव ,विद्यापीठातील इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकोसर्ट इंडिया लिमिटेड चे कार्यकारी संचालक श्री अनिल जाधव आणि एकोसर्ट (ई अँड एच ) फ्रांस येथील प्रशिक्षण समन्वयक कु रोझेन रिचारडीओ यांचे सहकार्याने सदर अभ्यासक्रमाचे प्रारूप ठरविण्यात आले आले असून सेंद्रिय शेती, प्रमाणीकरण या सारख्या महत्वाच्या ठरणाऱ्या या महात्वाकांक्षी अभ्यासक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University and Ecocert (E&H) France to jointly conduct Post Graduate Diploma Course in “Organic Certification” Live translation Published on: 28 July 2022, 07:02 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters