1. बातम्या

कृषी ड्रोनचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी DFI च्या अध्यक्षांनी कृषी जागरणला भेट

कृषी जागरण नेहमीच शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवून कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांना कृषी जागरणच्या केजे चौपालमध्ये कृषी विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले जाते.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
DFI President visits Krishi Jagran

DFI President visits Krishi Jagran

कृषी जागरण नेहमीच शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवून कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांना कृषी जागरणच्या केजे चौपालमध्ये कृषी विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले जाते.

काल मंगळवारी ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष स्मित शाह कृषी जागरण चौपालमध्ये सहभागी झाले होते. कृषी जागरण संस्थापक आणि मुख्य संपादक एमसी डॉमिनिक आणि कृषी जागरण टीमने त्यांचे स्वागत केले.

डीएफआय (ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष "स्मित शाह" म्हणाले, कृषी आधुनिकीकरणाचा भाग म्हणून कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानासोबत काम करण्याची गरज आहे. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर.

येत्या काही वर्षात कृषी क्षेत्रात ड्रोनचे महत्त्व खूप वाढणार आहे, त्यामुळे मजुरांची टंचाई दूर होणार असून, शेतकऱ्यांचा अमूल्य वेळ, पाणी आणि योग्य प्रमाणात रसायनांची फवारणी करण्यातही हातभार लागेल, असे ते म्हणाले.

शेतकरी मित्रांनो 12 व्या हप्त्याची स्थिति घरी बसून एका कॉलवर तपासा; जाणून घ्या

ग्रामीण भागातही रोजगाराच्या संधी निर्माण होतील. केवळ दहावीपर्यंत शिकलेले शेतकरी बांधव 5 दिवसांच्या ड्रोन पायलट कोर्सचे प्रशिक्षण घेऊन ड्रोन पायलट परवाना मिळवू शकतात, जेणेकरून त्यांना रोजगार मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय ड्रोन वापरण्यासाठी इतर कोणत्याही परवान्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

'FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही'

ड्रोनवर सबसिडी मिळते

1. 100 टक्के कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र
2. अनुदान, FPO, सहकारी संस्थांना 75 टक्के अनुदान
3. CHC ला 40 टक्के सबसिडी, इच्छुक ग्रामीण उद्योजकांना (ज्यांना छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे) आणि 90 टक्के बँक कर्ज कृषी इन्फ्रा फंड अंतर्गत दिले जाते.
4. ड्रोनच्या मदतीने शेतकरी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करून त्यांचा वेळ तर वाचवू शकतातच शिवाय त्यांचे उत्पन्नही वाढवू शकतात.

ड्रोनच्या अनुदानित रकमेवर 90% पर्यंत कर्ज

“सुमारे 6-8 लाख रुपये किमतीचे ड्रोन खरेदी करण्यासाठी, भारत सरकारने (GOI) मोठ्या अनुदान योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. कृषी विज्ञान केंद्र, केव्हीके आणि सरकारी विद्यापीठांसाठी, एकूण मूल्याच्या 100% अनुदान दिले गेले आहे.

शेतकऱ्यांना शेती यंत्रे खरेदी करण्यासाठी मिळणार 80 टक्यांपर्यंत अनुदान; असा घ्या लाभ

English Summary: DFI President visits Krishi Jagran to convey the importance of agricultural drones to farmers Published on: 21 September 2022, 10:51 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters