सध्या राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी ऊस तोडणीला होणारा विलंब यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. जून महिना उजाडला तरी उसाचा प्रश्न कायम आहे. राज्यातील साखर कारखाने सुरु आहेत मात्र ऊस तोडणीचे काम अद्यापही संपलेले नाही.
राज्यात अनेक जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. हा ऊस गाळप करण्याचे आव्हान साखर कारखाने आणि राज्य सरकारसमोर आहे. याबाबत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत तरीदेखील शेतकऱ्यांसमोरील अतिरिक्त उसाचा प्रश्न अजूनही कायम आहे. यावल तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने सुद्धा हताश होऊन आपल्या दोन एकर ऊसात गुरे सोडली.
मुक्ताईनगर मधील कारखान्यास ऊस तोडणीसाठी वारंवार विनंती करूनही तयार न झाल्याने अखेर त्या शेतकऱ्याने कारखान्याचा निषेध करण्यासाठी हे पाऊल उचलले. वर्षभर या पिकासाठी शेतात अमाप कष्ट घेऊन मुक्ताईनगर कारखान्याकडे ऊस नोंदवूनही तोडणीचे काम वेळेत झाले नाही. त्यामुळे हताश होऊन शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
ठरलं तर! पीक विम्यासाठी सरकार देतयं 80 कोटी 36 लाखांचा निधी; 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
राजेंद्र नीळकंठ महाजन व नीळकंठ महाजन यांनी त्यांच्या गट क्रमांक ३१/१ मधील दोन एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. या उसाची नोंदणी त्यांनी मुक्ताईनगर साखर कारखान्यात केली होती. वर्षभर या पिकाचे योग्य संगोपन केले जेणेकरून त्यांना त्यातून चांगला नफा मिळेल. मात्र वारंवार विनंती करूनही कारखान्याने ऊसाची तोडणी केलीच नाही. १२ महिने झाले तरी ऊसाची तोडणी झाली नव्हती.
लवकरात लवकर ऊस तोडणीचे काम पूर्ण करून खरीप हंगामासाठी शेत मशागतीसाठी मोकळे करायचे होते. मात्र इतके महिने उलटून गेले तरी ऊस अजून फडताच आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर साखर कारखान्याचा निषेध म्हणून उभ्या उसात गुरे सोडली. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडला होता.
त्यामुळे यावल – रावेर तालुक्यातील शेतकरी उसाची नोंदणी मुक्ताईनगर येथील साखर कारखान्यामध्ये करतात. मात्र कारखान्याकडून वेळेत ऊसाची तोडणी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान होत आहे. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने चालू रहातील यांसारखे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले असले तरीही अतिरिक्त उसाचा प्रश्न काही सुटला नाही.
महत्वाच्या बातम्या:
मोदींकडून स्वनिधी योजनेची घोषणा; मिळणार 50 हजार रुपये
काय सांगता! जगातील सर्वात मोठ्या गवताची जगभरात चर्चा, लांबी इतकी मोठी की...
Share your comments