आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी घडत असतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. सध्या राज्यात अशाच एका गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली आहे. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथे असलेल्या एका बोकडाला राज्यभरातून प्रसिद्धी मिळत आहे. त्याच्या प्रसिद्धीचे कारणही तसंच आहे. या बोकडाला चक्क 23 लाखाची मागणी होत आहे.
आबासो रामचंद्र देसाई यांचा सोन्या नावाचा बोकड दीड वर्षांचा असून त्याचे वजन तब्बल 65 किलोच्या आसपास आहे. बोकडाला चक्क 23 लाखाची मागणी होत असल्याने सर्वांनाच धक्का बसत आहे. विशेष म्हणजे जन्मतःच या बोकडाच्या डोक्यावर अर्धचंद्रकोरची खून आहे. मुस्लिम समाजात माथ्यावर अशा प्रकारची अर्धचंद्रकोर असलेल्या बोकडाची कुरबानी देणे महत्वाचे मानले जाते. त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून मुंबई, पुणेसह अनेक भागातून या बोकडाची मागणी करण्यात येत आहे.
महिला शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे? कृषिमंत्री दादा भुसे यांचे सूचक वक्तव्य
ही मागणी हजारात नाही तर लाखात केली जातीये. या सोन्या नावाच्या बोकडाला आतापर्यंत 18 लाख 50 हजारापर्यंत मागणी करण्यात आली आहे. जन्मतःच बोकडाच्या डोक्यावर अर्धचंद्रकोर असल्यामुळे सर्वांनाच याचे कुतूहल वाटत आहे. सध्या बोकडाला 23 लाखाची बोली लागल्याने लोकांनी या बोकडाला पाहण्यासाठी गर्दी केली आहे. या बोकडाची सगळ्याच भागात चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या:
गोड ऊसाची कडू कहाणी: शेतकरी पती-पत्नीचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न
दीड कोटींचे बक्षीस,सगळ्यांना जेवण, बैलांची तपासणी; रंगणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत
Share your comments