होळी सना दिवसी आंदोलन सुरुच प्रशासन घेतय बघ्याची भुमीका
चिखली- मौजे अन्वी येथील गट नं 189व 190इ क्लास वहिती जमीनीवरील अतिक्रमण हटवण्यात यावे,या मागणीसाठी आन्वी येथील नागरीकांनी गावामधे दि 28/10/2021
रोजी उपोषण केले तेव्हा प्रशासनाने आंदोलनकर्ते यांना मोजणी झाल्यावर 8दिवसात कार्यवाही करुण वहिती जमीनीवरील अतिक्रमण काढण्यात येईल असे अश्वासन दिले होते.परंतु त्या अतिक्रमीत जमीनीची मोजणी झाली खुना निश्चित झाल्या परंतु अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन धजावत नसल्याने आन्वी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा प्रशासना विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसत दि16मार्च पासुन गावातच आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
तर होळी सण असतांना सुद्धा आंदोलन सुरुच असुन प्रशासनाच्या दुर्लक्षीत पणामुळे आंदोलनाची वेळ आली असल्याची खंत आंदोलकर्ते यांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील मौजे अन्वी गावातील गट क्र१८९,१९०मधील जमीनीवर अतिक्रमण केले आहे.यासाठी अतिक्रमण धारक विरुद्ध ग्रामपंचायत असे अनेक वर्षापासुन न्यायालय ,आयुक्त कार्यालय यांच्याकडे प्रकरण देखील सुरु होते याचा निकाल ग्रामपंचायत बाजुने लागला आहे.तर यामधे अतिक्रमण धारक यांचे प्रकरण खारीज केले गेले आहे.या करीता नियमा प्रमाणे संरक्षणाची मागणी करुण पोलीस संरक्षण मिळणेबाबतच्या रक्कमेचा भरणा सुद्धा करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी अतिक्रमण धारकांना वारंवार नोटिस सुद्धा बजवण्यात आल्या आहे.सर्व निकाल ग्रामपंचायत बाजुने म्हणजेच शासनाच्या बाजुने असतांना सुद्धा प्रशासनाकडुन कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी अतिक्रमण काढण्यात यावे,या मागणीसाठी आॅक्टोबर महिण्यामध्ये गावातच उपोषणास सुरुवात केली होती.तर या आंदोलनाची दखल घेत चिखली तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी मोजणी झाल्यावर ८दिवसात अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करु असे अश्वासन आंदोलकर्ते यांना दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली होती.परंतु मोजणी झाली,सिमा देखील निश्चित झाल्या परंतु प्रशासनाकडुन चाल ठकल पणा होत असल्याने व विविध बिनबुडाचे कारणे दाखवुन वेळकाढुपणा केला जात असल्याने ग्रामस्थांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम देत स्मरणपत्र दिले होते.
परंतु तरीसुद्धा कार्यवाही होत नसल्याने व दिलेल्या लेखी अश्वासनाची पुर्तता होत नसल्याने ग्रामस्थांनी दि १५मार्च पासुन पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली असुन मौजी आन्वी येथील इ क्लास गट नं १८९व१९०मधील वहीती जमीनीवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे,लेखी अश्वासनाची पुर्तता न केल्याने व कोर्टाचा आवमान केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी,व दि२७/१०/रोजी अतिक्रमण काढण्यासाठी आलेला फौज फाटा वापस गेल्याची दि ०१/११/रोजीच्या तक्रारीनुसार चौकशी होवुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या उपोषणा दरम्याण करण्यात आल्या असुन तिसरा दिवस उजाडला तरीसुद्धा आंदोलन सुरु असुन ऐन सनाच्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरुच आहे हे विशेष तर आता तरी प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल आंदोलकर्ते उपस्थीत करीत आहेत.
Share your comments