केंद्रातील मोदी सरकार लवकरच नवी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून 'कर्तव्य पथ' करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनेही यासाठी तयारी सुरू केली आहे. नवी दिल्ली नगर परिषदेने (NDMC) राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नामकरण करण्याबाबत 7 सप्टेंबर रोजी विशेष बैठक बोलावली आहे.
यावेळी हा प्रस्ताव परिषदेसमोर ठेवला जाईल. इंडिया गेट येथील नेताजींच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण मार्ग आणि परिसर कर्तव्यपथ म्हणून ओळखला जाईल. बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर केंद्र सरकारकडून लवकरच राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून 'कर्तव्य पथ' करण्याची अधिसूचना जारी केली जाऊ शकते.
इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन पर्यंतचा मार्ग राजपथ म्हणून ओळखला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी येथे भव्य परेड होते. राजपथ हा नवी दिल्ली नगर परिषद (NDMC) अंतर्गत उच्च सुरक्षा क्षेत्र आहे. इंग्रजांच्या काळात राजपथला किंग्सवे म्हटले जायचे. यापूर्वी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 2016 मध्ये दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रेसकोर्स रस्त्याचे नामकरण करण्यात आले होते.
कृषी जागरणचे २६ व्या वर्षात पदार्पण, देशातील शेतकऱ्यांचे हित जोपासणारा पहिला मीडिया हाऊस..
याला लोककल्याण मार्ग असे नाव ठेवण्यात आले होते. तसेच रोडचे 28 ऑगस्ट 2015 रोजी मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असे नामकरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विजय चौक ते इंडिया गेट या संपूर्ण मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.
सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर आनंद महिंद्रा यांनी घेतली शपथ, म्हणाले यापुढे कधीच कारमध्ये..
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारी संसद भवनाची नवीन इमारत सुमारे ६५,४०० चौरस मीटरमध्ये बांधली जाणार असून ती भव्य कलाकृतींनी परिपूर्ण असेल. यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे. राजपथाच्या बाजूने सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये राज्यनिहाय खाद्यपदार्थांचे स्टॉल, सर्वत्र हिरवळ, ग्रॅनाइट वॉकवे, वेंडिंग झोन, पार्किंग लॉट्स आणि चोवीस तास सुरक्षा असेल.
महत्वाच्या बातम्या;
बारामती मिशनला सुरुवात! कन्हेरी मंदिरात नारळ, पवार ५५ वर्ष हरले नाहीत, त्याच मंदिरात बावनकुळे जाणार
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर राणे कुटुंबाच्या कारला अपघात, ट्रकने दिली धडक
शेतकऱ्यांनी जगायचे कसे? उडीद, तुरीचे मोठे नुकसान, रोहित पवारांची मदतीची मागणी
Share your comments