पाण्याअभावी वाळत चाललेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्याकडे केली. याबाबत निवेदनात देण्यात आले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात शेतीच्या पाण्यासाठी उपसा बंदी लागू केल्याने ऊस, सोयाबिन तसेच भाजीपाला आदी सर्व पिके होरपळून गेली आहेत. अद्यापही मान्सून लांबल्याने संपूर्ण जून महिना पूर्णतः कोरडा गेला आहे.
अनेक नद्यांनी तळ गाठलेला आहे. शेतकऱ्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. असे असताना शासनाकडून अद्यापही पिकांचे पंचनामे करण्यास सुरूवात झालेली नाही. पाऊस लांबल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
एका अंड्याची कमीत चक्क १०० रुपये, जाणून घ्या काय आहे खासियत..
आता तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करणे आवश्यक आहे. धरणातील पाणीसाठाही मर्यादीत आहे. त्यातच विद्युत कंपनीने शेतीसाठी विद्युत पुरवठ्यामध्ये कपात केली आहे. अनेक ठिकाणी उपसा बंदी लागू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाला आहे.
हजारो एकर शेती वाळून गेली आहे. तरीही पंचनामे करण्यात प्रशासकीय पातळीवर चालढकल केली जाते. तसेच देवस्थान समितीवर कोणत्याही राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांची नेमणूक न करता प्रशासक म्हणून सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांचेकडेच ठेवले पाहिजेत. राजकीय दृष्ट्या सोयीसाठी दुसर्या व्यक्तींची नेमणूक झाली तर याला आमचा विरोध राहिल.
आज जागतिक फणस दिवस, जाणून घ्या फणसाचे आरोग्यासाठीच फायदे
तरी शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने प्रत्येक गावातील पंचनामे करणे संदर्भात संबंधित तलाठी व सर्कल यांना आदेश देण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, जनार्दन पाटील मिलिंद साखरपे, राम शिंदे, वैभव कांबळे, अजित पोवार, साताप्पा पाटील, रावसो डोंगळे, रंगराव पाटील आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा निर्णय, ग्रीन हायड्रोजन धोरणासह घेतले महत्वाचे निर्णय..
आम्ही साहेबांच्या सोबत!! बैलाच्या अंगावर लिहीत सांगलीतल्या वाळवामधील शेतकऱ्याचं पवार प्रेम दाखवलं..
टोमॅटोने केला कहर! दिल्लीत टोमॅटो 160 रुपये किलो....
Share your comments