आंबा बाजारपेठेला कोरोनाचा फटका; मागणी घटली

14 July 2020 04:16 PM By: भरत भास्कर जाधव


कोरोनामुळे देशसह पुर्ण जगाचे अर्थ गणित बिघडले आहे.  अधिक संसर्ग होऊन नागरिकांचा जीव जाऊ नये यासाठी सरकारने देशा लॉकडाऊन लागू केले. परंतु या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर परिमाण झाला. अनेकांच्या रोजगार गेला, अनेक कारखाने बंद पडले आहेत, या स्थितीला रुळावर आणण्यासाठी  आणि  अर्थव्यवस्था व्यवस्थित रुळावर राहावी यासाठी केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्राताला मदत करत आहे. बऱ्याच ठिकाणची बाजारपेठ सुरु झाली आहेत, काही उत्पादक कंपन्यांनी आपले उत्पादन सुरु केले आहे. पण अजून काही भाग रहिला असून तो अजून लॉकडाऊनच्या परिणामातून बाहेर आलेला नाही.  यातील एक भाग म्हणजे आंबा विक्रीआंबा विक्रीतून  दरवर्षी देशाला मोठा महसूल मिळतो.

परंतु यंदा मात्र आंब्याच्या बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे.  यंदा आंबा बाजारपेठेतून येणारा महसूल २० ते ३० टक्क्यांनी खाली घसरला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लॉकडाऊनमध्ये घटलेली मागणी. नागरिक अधिक पैसा खर्च करण्यात तयार नाहीत, आपल्याकडील पैसा बाहेर काढण्यास नागरिक तयार नसल्याने अर्थ गणित थांबले आहे.  दुसरं मोठं कारण म्हणजे , निर्यात बंद.  साधरण दरवर्षाला भारतातून ५० हजार टन आंब्याची निर्यात होत असते. परंतु यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्यात बंद झाली आहे. दरम्यान निर्यातीत वाढ होण्यासाठी सरकार निर्यात करामध्ये सूट दिली आहे, पण याचा कोणताच सकारात्मक परिणाम हाती लागलेला नाही. 

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जून महिन्यात तर कोरोनाबांधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. याचा परिमाण हा आंबा उद्योगावर झाला आहे. यंदाचे वर्ष आंबा उत्पादकांसाठी खूप वाईट गेले आहे, आंबा उत्पादकांना १५ ते २० किलो दराने आंबा विकावा लागत आहे. यामुळे हे वर्ष आंबा उत्पादकांना नुकसानकारी ठरले आहे, दराच्या समस्येसह शेतकऱ्यांना आंब्यावरील रोगराईचा मोठा फटका बसला आहे. यामुळे आंब्याचे उत्पादनही कमी झाले आहे.

Coronavirus Corona hits mango market mango market government lockdown Mango Export आंबा निर्यात कोरोना व्हायरस आंबा market आंबा मार्केट आंबा बाजारपेठ सरकार लॉकडाऊन कोरोना व्हायरसचा आंबा मार्केटला फटका
English Summary: Corona hits mango market; demand declines

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.