जळगाव: रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतासह अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे बरेच नुकसान झाले आहे. चार महिने उलटूनदेखील युद्धबंदीची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. युक्रेनमध्ये अजूनही रशियन सैन्य तैनात आहे. या युद्धामुळे भारताला महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. युद्धामुळे अनेक देशांना झळ बसत असून सध्या जगभरात गव्हाच्या टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र निर्यात बंदीमुळे आता गव्हाच्या किमतीत देशांतर्गत मोठी घसरण झाली आहे.
दरम्यान, या युद्धामुळे गव्हाला परदेशात मागणी वाढल्याने भारतीय बाजारपेठेत गव्हाच्या भावात तब्बल ४५० रुपये प्रति क्विंटलमागे दरवाढ झाली हाेती. केंद्र सरकारने गहू निर्यात बंदी आणल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. आठवडाभरातच जळगावच्या बाजारपेठेत गव्हाची किंमत घसरली असून तब्बल ३५० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
अंतरराष्ट्रीय निर्यात कंपन्यांनी राजस्थान व मध्य प्रदेश या उत्पादक राज्यातून लाखाे टन गव्हाची मागणी करत अधिक भावाने गव्हाची खरेदी केली.परिणामी शेतकऱ्यांनी खासगी बाजारातच गव्हाची विक्री केली. त्यामुळे शासकीय केंद्रांवर गहूच विक्रीसाठी पाठवण्यात आला नाही. स्वदेशातच गव्हाची किंमत वाढेल यामुळे केंद्र सरकारने गहू निर्यात बंदी केली. त्यामुळे आता गहू निर्यातीत लक्षणीय घट झाली असून स्वदेशातच गव्हाचे प्रमाण वाढू लागले आहे. परिणामी गव्हाच्या दरात घट झाली आहे.
एक असाही अवलिया; पाण्यासाठी खोदले 70 हून अधिक चर, देशाने घेतली नोंद
प्रतिवर्षी नवीन गहू येण्याआधी जुन्या गव्हाच्या दरात ५० ते ६० रुपयांची वाढ हाेते. मात्र यंदा आखाती देशांना गव्हाची माेठ्या प्रमाणावर निर्यात झाल्याने गव्हाच्या दरात तब्बल ४५० रुपयांची प्रति क्विंटलमागे वाढ झाली होती. मात्र निर्यातीवर बंदी आणल्यामुळे आठवडाभरातच गव्हाच्या दरात तब्बल २५० रुपयांची घसरण झाली. तसेच पुन्हा एकदा मंगळवारी यात १०० रुपयांची घसरण झाली आहे. याची माहिती दाणाबाजार असाेसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारीया यांनी दिली. मात्र शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने गहू बाजारात न आणता राखून ठेवला असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
बांबूच्या सायकलीची होतीये सगळीकडे चर्चा; आरोग्यासाठीही आहे फायदेशीर
भाज्यांचे दर शंभरी पार; वाचा नेमके आत्ताच का वाढले आहेत भाज्यांचे दर
Share your comments