1. पशुधन

मत्स्यपालन करताना या ५ टिप्स तसेच सापळा लावण्याचे महत्व जाणून घ्या

शेती सोबतच तरुण वर्गाचा मत्स्यपालन व्यवसायाकडे सुद्धा चांगला कल ओळलेला आहे. माशांचे उत्पादन वाढावे यासाठी वेगळ्यावेगल्या तंत्राचा शोध लावला जात आहे. मासे पकडण्याच्या तंत्रात सुद्धा काळानुसार बदल केला जात आहे. या व्यवसायाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना काढत आहे. मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ होतो मात्र त्यांना हे माहीत असणे आवश्यक असते.यामुळे उत्पादनात वाढ होईल आणि मत्स्य उत्पादक वर्गाची आर्थिक स्तिथी सुद्धा सुधारेल. आज आपण सापळा लावण्याचे महत्व समजून घेणार आहोत.

किरण भेकणे
किरण भेकणे
fish farming

fish farming

शेती सोबतच तरुण वर्गाचा मत्स्यपालन व्यवसायाकडे सुद्धा चांगला कल ओळलेला आहे. माशांचे उत्पादन वाढावे यासाठी वेगळ्यावेगल्या तंत्राचा शोध लावला जात आहे. मासे पकडण्याच्या तंत्रात सुद्धा काळानुसार बदल केला जात आहे.या व्यवसायाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध  योजना  काढत आहे.  मत्स्यपालन  करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ होतो मात्र त्यांना हे माहीत असणे आवश्यक असते.यामुळे उत्पादनात वाढ होईल आणि मत्स्य उत्पादक वर्गाची आर्थिक स्तिथी सुद्धा सुधारेल. आज  आपण सापळा लावण्याचे महत्व समजून घेणार आहोत.

मत्स्यव्यवसाय वाढीबरोबर तो योग्य दिशेने घेऊन जाणे हे खूप महत्वाचे आहे नाहीतर शेतकऱ्यांना यामध्ये नुकसान झेलावे लागते. जे शेतकरी मासे पाळतात त्यांना वेळोवेळी तलावाचा दर्जा राखणे गरजेचे असते तसेच पाण्याची तपासणी करावी लागते आणि तळाव्यात जाळे सुद्धा चालवावे लागते. जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर समस्यांना सामोरे जावे लागते.

कोणते जाळे फायदेशीर ठरणार आहे?

तलावातील मासे तपासण्यासाठी वेळोवेळी सापळा फेकावा लागतो. संपूर्ण तलाव्यात दोन प्रकारचे जाळे असते. नायलॉनचे जाळे डासांच्या जाळ्यासारखे असते त्यास चॅट ट्रॅप असे सुद्धा म्हणतात. या जाळीचे छिद्र खूप लहान असतात त्यामुळे मनुष्यबळ खूप लागते. दुसरे जाळे म्हणणे ताना जाळे. या जाळीचे छिद्र मोठे असते.

सापळा चालवताना ह्या गोष्टी आहेत महत्वाच्या:-

जर सापळ्याचा उपयोग एका तलाव्यासाठी होत असेल तर जास्त अडचणी निर्माण होत नाहीत पण दुसऱ्या तलावासाठी हे जाळे वापरले तर अडचणी निर्माण  होऊ  शकतात  कारण  दुसऱ्या तळाव्यातील विषारी घटक यामध्ये अडकून राहतात ज्याचा परिणाम उत्पादनावर होतो.मीठ किंवा पोटॅशियम परमॅग्नेट द्रावणात  जाळी  चालवण्यापूर्वी  बुडवावी  ज्यामुळे संसर्ग  दूर  होतात. व्यवसायिकांनी या दोन बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सापळा फिरवण्याचे काय आहेत फायदे:-

सापळा चालवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तळाव्याच्या आतील मासे धावतात आणि त्यांची पचनक्रिया सुधारते तसेच आरोग्य चांगले राहते आणि वाढ सुद्धा होते. दुसऱ्या फायदा म्हणजे सापळा चालवल्याने मासे किती मोठे झालेत हे समजते. काढणी केलेल्या माशांच्या प्रजाती यामध्ये आहेत की नाहीत हे सुद्धा समजते तसेच कोणता संसर्ग झाला आहे का नाही हे व समजते. महिन्यातून किमान दोन वेळा तरी सापळा चालवावा.

English Summary: Learn these 5 tips and the importance of setting traps while fishing Published on: 02 November 2021, 09:10 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters