अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे खते याला तोंड द्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. बोगस बियाणांमुळे बियाणे उगवण्यास अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशकाच्या संदर्भात व्हॉट्स ॲपवर तक्रार करता येणार आहे.
आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक बैठक घेतली. यावेळी कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आढावा घेतला. राज्यात अनेक ठिकाणी कापसाच्या बोगस बियाणांची विक्री होत आहे.
यासाठी महाराष्ट्रात असलेला महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९ व नियम २०१० अंतर्गत शेतकरी तक्रारी करतात. शेतकऱ्यांना त्वरीत न्याय मिळण्यासाठी कडक कायद्याची गरज असून त्याचे प्रारुप तयार करण्याचे निर्देश कृषीमंत्री मुंडे यांनी दिलेत.
पशुधन खरेदीसाठी बँका देतात फक्त ४ टक्के व्याजाने कर्ज, असा करा अर्ज...
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी व्हाट्स ॲप क्रमांक सुरू करण्याचा निर्देश दिले आहेत.
टोमॅटोचे भाव पडले त्यावेळी कुठं गेले होते आता ओरडणारे...?
शेतकऱ्यांनी व्हट्स ॲप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवण्यात येईल. भरारी पथकांना मेसेज जाऊन त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना मुंडे यांनी यावेळी दिल्या.
कोंबडा मिळेल का कोंबडा! एक किलो कोंबड्याचा भाव 800 ते 900 रुपये...
कौतुकास्पद! महिला बचत गटाने उभारला सामूहिक गोठा..
कृषिमंत्री होताच धनंजय मुंडे यांचा कामांचा धडाका! शेतकऱ्यांसाठी घेतले अनेक निर्णय..
Share your comments