1. बातम्या

पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

अतिवृष्टीतून शेतकरी सावरत असतानाच, देशात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे थंडीचा कडाडा वाढत असतानाच पुढील 48 तासांत देशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Chance rain

Chance rain

अतिवृष्टीतून शेतकरी सावरत असतानाच, देशात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे थंडीचा कडाडा वाढत असतानाच पुढील 48 तासांत देशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने, बळीराजाची चिंता वाढली आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टीवरील दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर 9 नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 48 तासांत तमिळनाडू-पुद्दुचेरी-कराईकल येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर 10 व 11 नोव्हेंबरला जोरदार वारे वाहण्याची अंदाज आहे.

घोडगंगा सहकारी कारखान्यात राष्ट्रवादीच्या पॅनलचे वर्चस्व, विरोधकांना धक्का

महाराष्ट्रात दिवाळीनंतर आतापर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश पडत होता. मात्र, आज सकाळपासून सूर्यप्रकाश गायब झाला आहे. वातावरण ढगाळ झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्राची दिल्ली होणार? महाराष्ट्र डेंजर झोनकडे, धूलिकणांचे प्रदूषणामुळे दिला धोक्याचा इशारा

दरम्यान, आताच्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानातून शेतकरी अजूनही सावरला नाही. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकरी होणार करोडपती! महामार्ग शेतात आणि जमिनीला करोडोंचा भाव..
"कारखान्याच्या वजनकाट्यात एक किलोचा फरक पडला तरी एक लाखाच बक्षीस देणार"
साखर निर्यात कोट्यात महाराष्ट्रावर अन्याय, उत्तर प्रदेशला जास्त कोटा...

English Summary: Chance of rain in next 48 hours, forecast Met department Published on: 08 November 2022, 04:46 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters