खाद्य तेलाचे दर कधी नव्हे एवढा उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. जर आपण दोन वर्षाचा विचार केला तर सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरांमध्ये 50 ते 90 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली होती.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेटच कोलमडून पडले होते. परंतु आता जागतिक पातळीवर काही समीकरणे बदलत असताना गेल्या पंधरा दिवसांचा विचार केला तर खाद्यतेलाच्या किमतींमध्ये काहीसा दिलासा आला आहे.
केंद्र सरकारच्या अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने बुधवारी घेतलेल्या देशातील खाद्यतेलाच्या व्यापाराशी संबंधित बैठकीत कपात करण्याचे निर्देश दिले असून आता यामुळे प्रतिलिटर खाद्य तेलाचे दर किमान वीस रुपयांपर्यंत खाली येण्याची दाट शक्यता आहे.
केंद्र सरकार आता ऍक्शन मोडवर
झालेल्या या बैठकीत खाद्य तेल कंपन्यांनी एमआरपी मध्ये बदल करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना देण्यात आल्या. येणाऱ्या काळात देखील खाद्यतेलाच्या दरात आणखी कपात केली जाण्याची शक्यता आहे.
सध्यातरी प्रति लिटर 20 रुपये पर्यंत किंमत कमी करण्याचा सरकारचा एक अंदाज आहे.या बैठकीत सरकारने दिलेल्या निर्देशानु
खाद्य तेल कंपन्यांनी देखील दर आणखी कमी करण्याचे मान्य केले असून सध्या किरकोळ बाजारात खरेदी केलेले तेल चढ्या भावाने विकले जात असले तरी या कपातीचा परिणाम येत्या काही दिवसात दिसून येईल आणि भारतीय ग्राहकांना दिलासा मिळेल.
नक्की वाचा:२०२३ पर्यंत बटाटे आयात करण्यास परवानगी, दर कोसळण्याची शक्यता
नक्की वाचा:भारत आणि रशियामध्ये कृषी क्षेत्राबाबत सामंजस्य करार; आता कृषी क्षेत्राला मिळणार नवी
Share your comments