राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अनेकांची धाकधूक वाढली होती. राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat) निकाल आज जाहीर होत आहे.
या निवडणुकीत सध्या एका गावच्या निकालाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील पाथरी ग्रामपंचायतीने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.
याठिकाणी पहिल्यांदाच महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचा सरपंच निवडूण आला आहे. भंडाऱ्यात आम आदमी पार्टीने पहिल्यांदाच खाते खोलले आहे. यामुळे याची चर्चा थेट दिल्लीपर्यंत होत आहे. येथील पाथरी ग्रामपंचायतीत सरपंच पदाकरिता आम आदमी पार्टीच्या विद्या गुरुदास कोहळे या विजयी झाल्या आहेत.
शेतकऱ्यांनो जुनी विहिरींच्या दुरुस्तीसाठी मिळणार 50 हजार रुपये, वाचा सविस्तर..
त्यांच्या विजयानंतर एकच जल्लोष करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
110 कारखान्यांनी दिली नाही एकरकमी एफआरपी, सरकारचे लक्ष आहे का?
बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात करण्यात आले होते. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे. या गावाची मोठी चर्चा यामुळे झाली.
महत्वाच्या बातम्या;
जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर मंगेश चव्हाणांनी केलं 'हे' काम, एकनाथ खडसे याचा फोटो..
गायीचे दूध 90 रुपये, म्हशीचे दूध 100 रुपये प्रतिलिटर दराने पशुपालकांकडून खरेदी करण्याची तयारी
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांच्या कारखान्यांना बिनव्याजी मदत
Share your comments