1. बातम्या

110 कारखान्यांनी दिली नाही एकरकमी एफआरपी, सरकारचे लक्ष आहे का?

सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे कारखाने किती दर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा ऊस दरावरून अनेकदा आंदोलन केले गेले. तसेच सरकारने देखील एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
sugarance frp

sugarance frp

सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे कारखाने किती दर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा ऊस दरावरून अनेकदा आंदोलन केले गेले. तसेच सरकारने देखील एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला.

असे असताना यंदाच्या हंगामात नोव्हेंबरअखेरही राज्यातील कारखान्यांनी (Sugar Mills In Maharashtra) एकरकमी 'एफआरपी' (One Time FRP) देण्याकडे काणाडोळाच केल्याचे चित्र आहे. यामुळे याकडे सरकारचे लक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यामध्ये १६४ पैकी केवळ ५४ साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे. तब्बल ११० कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांना एकरकमी 'एफआरपी' दिलेली नाही. यामुळे पैसे कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित केले जात आहे.

वडगाव बारामतीत जनावरांचा बाजार सुरू, इतर ठिकाणी बंद, शेतकरी संघटना आक्रमक..

दरम्यान, ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत ६६ टक्के 'एफआरपी'ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. ३० नोव्हेंबरअखेर राज्यात ११६ लाख टन साखरेचे गाळप झाले. याची एकूण 'एफआरपी'ची रक्कम ३६६७ कोटी रुपये इतकी होते.

यापैकी २४४९ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. अजूनही १२७७ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देय आहे. शेतकरी संघटनांनी कारखान्यानुसार आंदोलन करून एकरकमी एफआरपी जाहीर करण्यासाठी दबाव टाकला.

25 वर्षांच्या तरुणाने करून दाखवलं! सव्वा एकरात पपईतून 23 लाखांचे उत्पादन

काहींनी स्वतःहूनच एफआरपी जाहीर केली. परिणामी बहुतांश कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर करून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो जुनी विहिरींच्या दुरुस्तीसाठी मिळणार 50 हजार रुपये, वाचा सविस्तर..
शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या 'त्या' शेळीची माहिती..
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचे होणार

English Summary: 110 factories have not given lump sum FRP, the government Published on: 12 December 2022, 12:12 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters