मोदी सरकारने नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील सुमारे साडेअकरा कोटी शेतकऱ्यांना एक मोठे गिफ्ट दिले होते. नववर्षाच्या मुहूर्तावर त्या वेळी शेतकऱ्यांना मोदी सरकार ने पीएम किसान सम्मान निधि योजनेचा (Pm Kisan) दहावा हफ्ता सुपूर्द केला होता.
आता या योजनेच्या पात्र शेतकर्यांना पुढील हप्ता कधी मिळेल याबाबत उत्सुकता लागली आहे. या योजनेचे कोट्यावधी शेतकरी पीएम किसानच्या अकराव्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. मागील हप्ता जमा होऊन आता जवळपास चार महिने उलटत आली यामुळे पुढील हप्ता केव्हा येईल याबाबत शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा : धक्कादायक! मोदी सरकारने पीएम किसान योजनेचा निकष बदलला महाराष्ट्रातील तब्बल 21 लाख शेतकरी राहणार वंचित
मीडिया रिपोर्टनुसार, मोदी सरकार (Modi Government) अकरावा हप्ता देखील एखाद्या शुभमुहूर्तावर जमा करणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता (11th installment of PM Kisan Yojana) अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची आता दाट शक्यता असल्याचे जाणकार लोक स्पष्ट करत आहेत. अर्थातच मे महिन्याच्या पहिल्याचं आठवड्यात या योजनेचा 11वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो.
Important News : मोठी बातमी! प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 9 लाख शेतकऱ्यांचे कोटी रुपयांचे नुकसान; पीएम किसान योजनेपासून वंचित
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, देशातील सुमारे साडेअकरा कोटी शेतकरी या योजनेसाठी पात्र असून राज्यातील एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत म्हणून मे महिन्यात या योजनेच्या कोट्यावधी पात्र शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार असल्याचे समजत आहे. मागच्या वर्षी देखील मे महिन्यात शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता देण्यात आला होता.
हेही वाचा : हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, पिकांचे नुकसान
पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्राची योजना (Central Government Scheme) असून यासाठी सर्व अर्थसहाय्य केंद्र सरकार पुरवीत असते. असे असले तरी या योजनेची अंमलबजावणी करण्याचे कार्य राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
यामुळे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांची यादी केंद्राकडे सुपूर्द केली असल्याची माहिती समोर आली आहे. अकराव्या हफ्त्यासाठी सर्व प्रक्रिया मायबाप शासनाकडून पूर्ण केल्या गेल्या आहेत मात्र याची अंमलबजावणी अक्षयतृतीयाच्या शुभमुहूर्तावर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात बदल, काय आहेत नियम
Share your comments