1. बातम्या

Pm Kisan: अब वो दिन दुर नहीं…..! पीएम मोदी यांच्या ट्वीटमुळे पीएम किसान योजनेविषयी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जोरदार चर्चा

सध्या संपूर्ण देशात आरोपी हंगामातील सुगीची कामे सुरू आहेत. अनेक शेतकरी बांधव रब्बी हंगामातील शेतमालाची विक्री करत आहेत तर अनेक शेतकरी बांधव आगामी खरीप हंगामासाठी पुढे सरसावले आहेत. खरीप हंगामासाठी शेतकरी बांधव पूर्वमशागत करताना बघायला मिळत आहेत. शेतकरी बांधवांची लगबग सुरू असतानाच दिल्लीहून पीएम नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक संदेश दिला आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pm modi

pm modi

सध्या संपूर्ण देशात आरोपी हंगामातील सुगीची कामे सुरू आहेत. अनेक शेतकरी बांधव रब्बी हंगामातील शेतमालाची विक्री करत आहेत तर अनेक शेतकरी बांधव आगामी खरीप हंगामासाठी पुढे सरसावले आहेत. खरीप हंगामासाठी शेतकरी बांधव पूर्वमशागत करताना बघायला मिळत आहेत. शेतकरी बांधवांची लगबग सुरू असतानाच दिल्लीहून पीएम नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक संदेश दिला आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर ट्विट करताना शेतकरी बांधवांचे आभार मानले आहेत. एवढेच नाही माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांनी शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व कार्याचा गौरव देखील यावेळी केला आहे. मोदी यांनी पुढे सांगितले की, बळीराजा सशक्त बनेल तेव्हाच देश सशक्‍त बनेल.

पीएम मोदी यांनी पीएम किसान सम्मान निधि योजना या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी देखील एक महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे तसेच आगामी हफ्त्यासंदर्भात संकेत देखील दिले आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की केंद्र सरकारच्या पीएम किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो आणि आता दहावा हफ्ता उलटून तीन महिने झाले असल्याने पीएम मोदी यांचा हा ट्विटर मेसेज अकराव्या हफ्त्याविषयी काही संकेत तर नाही ना देत असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करताना सांगितले की, केंद्र सरकार शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवित आहे जेणेकरून शेतकरी सशक्त बनू शकेल. यावेळी त्यांनी पीएम किसान योजनेचा देखील उल्लेख केला तसेच पीएम किसान व्यतिरिक्तही अनेक शेतकरी हिताच्या योजना शेतकऱ्यांना नवसंजीवनी देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शेतकरी बांधव सक्षम बनत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले तसेच शेतकरी जेवढा सक्षम बनेल तेवढाच देश सक्षम बनेल असे देखील नमूद केले.

पीएम किसान सन्मान योजनेच्या 11व्या हफ्त्याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या चर्चा रंगल्या आहेत आणि अशातच पीएम मोदी यांचे हे ट्विट 11 वा हप्ता लवकरच येणार असल्याचे संकेत देत आहेत. कारण की देशाचे पंतप्रधान यांनी खुद्द या योजनेचा देशातील किती शेतकरी लाभ घेत आहेत आणि यासाठी शासनाला किती पैसे मोजावे लागतात याबाबत माहिती दिली आहे.

या योजनेअंतर्गत देशातील सुमारे अकरा कोटी तीन लाख शेतकऱ्यांना लाभान्वित केले जात असल्याचे सांगितले गेले. या एवढ्या शेतकऱ्यांना शासन 1.82 लाख कोटी रुपये देत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

मोदी यांच्या या ट्विटमुळे लवकरच अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाऊ शकतो असे चित्र बघायला मिळत असल्याचा दावा कृषी क्षेत्रातील जाणकार लोक करत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांनो अब वो दिन दूर नहीं जिस दिन 11वा हफ्ता आएगा! या महिन्याच्या शेवटापर्यंत किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा अकरावा हफ्ता येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

English Summary: Pm Kisan: Now that day is not far away… ..! Due to PM Modi's tweet, there is a lot of discussion about PM Kisan Yojana from the streets to Delhi Published on: 10 April 2022, 06:30 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters