भारत देशात विद्राव्य खतांची आयात मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारत देश या खतांच्या आयातीवर अवलंबून आहे. जी खते पाण्यामध्ये १००% विरघळतात व जी विविध पिकांना शास्त्रज्ञाच्या शिफारशीप्रमाणे फवारणीद्वारे किंवा सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळुन पिकांना दिली जातात त्यांना विद्राव्य खते असे म्हणतात. आणि याच खतांना परदेशातून सध्या बरीच मागणी आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात या खतांचे दर वाढले आहेत. परिणामी देशात जवळजवळ ५० ते ७० टक्क्यांनी खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. शिवाय या खतांची भीषण टंचाई जाणवत असून याचा थेट परिणाम हा आगामी पिकांवर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिकबाबींत होत असल्याचं समोर आले आहे.
फळबागांना विविध टप्प्यांत वेगवेगळ्या ग्रेडची विद्राव्य खतांची गरज असते. यात १९-१९-१९, १३-०-४५, ०-५२-३४ इत्यादींचा समावेश आहे. पिकांना त्या त्या टप्य्यात ती ती खते मिळणे आवश्यक असते. तरच पिकाचे उत्पादन हे भरघोस येते. शिवाय उत्पन्नही चांगले मिळते. मात्र त्या त्या अवस्थेत ती खते मिळाली नाही तर गंभीर परिणाम होऊ शकतो. सद्यपरिस्थितीला काही ग्रेडसच्या विद्राव्य खतांची टंचाई निर्माण झाली आहे. ही खते शेतकऱ्यांना मिळत नाहीत. जवळजवळ ५० ते ७० टक्क्यांनी ग्रेडची खते महाग झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च वाढला आहे. आपल्याला हे माहितच आहे की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतासह अनेक देशांना महागाईचा चांगलाच फटका बसला. आता या युद्धाचा विद्राव्य खतांवर देखील गंभीर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.
या युद्धाचे गंभीर पाडसाद आता खतांवर देखील पडताना पाहायला मिळत असून खत उत्पादक देशांनी निर्यातीवर बंधने आणली. त्यातून दर वाढ झाली. शिवाय स्फोरिक ॲसिड आणि पोटॅशचे दर हे दुप्पट झाले. याचा परिणाम म्हणजे संयुक्त आणि विद्राव्य खतांचे दरही वाढले. देशात सध्या विद्राव्य खतांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. आणि त्यातून ५० ते ७० टक्के दर वाढले. सध्या युद्धामुळे पोटॅश उपलब्ध होत नसल्याने इतर ग्रेडचे खतही बनवता येत नाही. सध्या ९०० रुपयांना मिळणारी पोटॅशची बॅग आता १७०० रुपयांना झाली. त्यामुळे विद्राव्य खतांचेही दर वाढले. भारत देशात विद्राव्य खतांची आयात चीन, युक्रेन, कॅनडा, हॉलंड, थायलंड, जॉर्डन इत्यादी देशांतून मोठ्या प्रमाणात होते.
विद्राव्य खताचे बरेच फायदे आहेत. तंज्ञानच्या मते पिकात विद्राव्य खते फवारणीतून पिकांना वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत फवारून दिल्यास पिकाच्या उत्पादनात वाढ होते. बऱ्याच वेळा अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीतील खते वाहून जातात अशा वेळी पाऊस थांबल्यावर संबंधित पिकाची गरज लक्षात घेऊन शास्त्रज्ञांच्या शिफारशीप्रमाणे फवारून विद्राव्य खताचा संबंधित पिकात वापर केल्यास त्या पिकांना अन्नद्रव्याचा पाठपुरवठा होतो. संबंधित अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
तसेच जमिनीत ओलाव्याचा अभाव असेल किंवा कडक उन्हाळ्यात फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकाची पाने टवटवीत होऊन ती कार्यक्षम राहतात. पिकाच्या फुलोऱ्यात मोहोर येण्याच्या काळात फलधारणा होत असताना व फळाची वाढ होण्याच्या काळात फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा शिफारशीप्रमाणे वापर केल्यास पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. पिकाची पाने किडीने खाल्ली गेली असल्यास नवीन पालवी फुटण्यासाठी शिफारशीप्रमाणे फवारणीयुक्त विद्राव्य खतांचा वापर केल्यास त्याचा पिकाला फायदा होतो.
महत्वाच्या बातम्या;
बातमी महत्वाची! शेतकऱ्यांना मिळणार कुंपणासाठी अनुदान,जाणून घ्या 'या' योजनेबद्दल
बातमी फायद्याची! शेतकरी बंधुनो आता काळ्या हळदीच्या शेतीतून कमवा लाखो रुपये
LPG Cylinder Price: महागाईचे सत्र सुरूच; महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ
Share your comments