1. बातम्या

'एकनाथ शिंदेंप्रमाणे आमदार फोडा आणि मुख्यमंत्री बना'

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची देखील शपथ घेतली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता नवीन सरकार स्थापन झाले असून सगळी जनता संभ्रमात आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
break MLA like Eknath Shinde and become CM

break MLA like Eknath Shinde and become CM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची देखील शपथ घेतली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता नवीन सरकार स्थापन झाले असून सगळी जनता संभ्रमात आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

असे असताना आता छत्तीसगढचे सरकार पाडून आपल्याला त्या राज्याचा एकनाथ शिंदे बनविण्यासाठी इन्कम टॅक्‍स विभागाचे अधिकाऱ्यांनी दबाव आणला होता, असा दावा या राज्यातील एका कोळसा व्यापाऱ्याने केला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. तसेच छत्तीसगढ सरकार पाडण्याचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केली असून त्याकरता छापे टाकले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

याबाबत सूर्यकांत असे या कोळसा व्यापाराचे लांब असून ते म्हणाले, आपल्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले की तुम्ही कॉंग्रेसच्या 40-45 आमदारांची यादी तयार करा आणि विरोधी पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन करा. तुम्हाला मुख्यमंत्री केले जाईल, असते वक्तव्य केले आहे. इन्कम टॅक्‍स विभागाने 30 तारखेला कोळशाशी संबंधित व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते. त्यात 90 कोटी रोख रक्कम आणि साडेचार कोटींचे दागिने जप्त केले होते.

शेतकऱ्यांनो भातशेतीत सोडा मासे, आधुनिक तंत्रामुळे शेतकरी कमवत आहेत लाखो रुपये..

तसेच मला छत्तीसगढचा एकनाथ शिंदे बनवण्याची त्यांची पूर्ण तयारी होती. अधिकाऱ्यांनी त्यांना तीन दिवस झोपू दिले नाही. मानसिक आणि शारीरिक छळवणूक केली. आणि आता त्याच प्रकाराला माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याकडून राजकीय रंग दिला जातो आहे, असेही सूर्यकांत म्हणाले. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काय सांगता! शाळांमध्ये रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी

दरम्यान, तपास संस्थांचा वापर करून सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी उतावीळ झाली आहे. हे या प्रकारावरून स्पष्ट झाले असल्याचे कॉंग्रेस नेते सुशील आनंद शुक्‍ला यांनी म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्रात जे झाले ते छत्तीसगढमध्ये होणार की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे. यामुळे येथील राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या;
राज्यात वाढतोय रेशील उद्योग, शेतकऱ्यांना 3 लाखांपेक्षा जास्तीचे अनुदान
जनधन खातेदारांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार 3 हजार रुपये
या गोष्टी कधीही चहासोबत खाऊ नका, आरोग्यासाठी आहे खूपच धोकादायक

English Summary: 'Break MLA like Eknath Shinde and become CM' Published on: 12 July 2022, 11:21 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters