1. बातम्या

आधार कार्डद्वारे दहा मिनिटात कसे बनवाल पॅन कार्ड; वाचा पुर्ण प्रक्रिया

KJ Maharashtra
KJ Maharashtra


आधार कार्डला आपल्यासाठी एक महत्वाचे सरकारी कागदपत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे, तसेच पॅन कार्ड ही सर्वांसाठी महत्त्वाची कागदपत्र आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पॅन कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट संबंधित आहे. आधार कार्ड सारखेच पॅन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र बसले. पॅनकार्ड शिवाय आपण बँकेत खाते उघडू शकत नाही किंवा तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा भरता येऊ शकत नाही. इतकेच नाही तर आता तुम्हाला मोठे ट्रांजेक्शन करायचे आहे तेथे तुम्हाला पॅन कार्डची आवश्यकता भासते. याशिवाय सरकारी कामांसाठी पॅन कार्डची आवश्यकता असते. अशाप्रकारे पॅन कार्ड किती आवश्यक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते बनवून घेणे फार आवश्यक आहे.

हेही वाचा :जन धन खात्याशी आधार लिंक नसल्यास होणार १.३० लाख रुपयांचे नुकसान

परंतु आता पॅन कार्ड कसं मिळवायचं किंवा कसं तयार करायचं असा प्रश्न प्रत्येकांना असतो. पण तुम्हाला माहिती आहे का पॅनकार्ड बनवणंम फार सोपे झालं आहे असं. तुम्ही तुमच पॅन कार्ड आधार कार्डच्या माध्यमातून घरी बसून एका मिनिटात बनवू शकता. अगोदर यासाठी फॉर्म भरायची आवश्यकता असायची आणि पॅनकार्ड यायला फार वेळ लागायचा. परंतु आता तुम्ही दुसऱ्या पद्धतीने ऑनलाइन जाऊन पॅन कार्ड मिळू शकतात. ते कसे याची माहिती या लेखात घेऊ.

 

ही माहिती घेण्यापूर्वी काही महत्त्वाची माहिती घेऊ. आधार कार्ड जसे युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया कडून लागू करण्यात येते.  त्याचप्रमाणे पॅनकार्ड इन्कम टॅक्स डिपारमेंट कडून लागू करण्यात येते. जर तुम्ही एकासाठी ऑनलाईन अर्ज करत असाल तर दहा मिनिटाच्या आत तुम्हाला पीडीएफ फॉरमॅटमध्ये प्राप्त होते. तर तुम्हाला घरी बसून मोफत घरी बसून पॅन कार्ड मिळणार आहे. पण त्यासाठी काही स्टेप्स फॉलो करावे लागतील .

 

 

 सगळ्यात महत्वाचे म्हणजे

1- इन्कम टॅक्स डिपारमेंटच्या ऑनलाइन पोर्टलवर जावे.

2- तिथे गेल्यानंतर आपल्याला क्विक लिंक्स सेकशन मध्ये दिसत असलेले इन्स्टंट पॅन थ्रू आधार वर क्लिक करावे.

3- त्यानंतर गेट न्यू पेन वर क्लिक करावे.

4- तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करावा लागेल. त्यानंतर असलेला कॅपच्या कोड समाविष्ट करून एक ओटीपी जनरेट करावा लागतो. तो पिन तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येतो.

5- त्यानंतर तू मला प्राप्त झालेल्या ओटीपी तेथे नोंदवावा.

6- त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार डिटेल्स व्हॅलिडेट करावे.

7- यासाठी तुम्ही तुमच्या पॅन कार्डचा ईमेल आयडीलाही व्हॅलिडेट करू शकता.

8- येथे तुम्हाला तुमच्या आधार डिटेल्सला युआयडीएआय कडून एक चेंज केल्यानंतर तुम्हाला एक इन्स्टंट पॅनकार्ड दिले जाते. या प्रक्रियेला फक्त १० मिनिटांचा वेळ लागतो.

9- येथे तुम्हाला पीडीएफ फॉरमॅटमध्ये प्राप्त झालेल्या पेन काढला सोप्या पद्धतीने डाउनलोड चेक स्टेटस पेन वर जाऊन आधार कार्ड नोंदणी प्राप्त करू शकता.

10- तुम्हाला हे पॅन कार्ड पीडीएफ फॉरमॅटमध्ये तुमच्या मेल आयडीवर मिळून जाते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters