कांदा या पिकाचा विचार केला तर याला लॉटरी पिक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.कारण कधी कधी कांदा हे शेतकऱ्यांना इतके काही देऊन जाते की शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होतो. परंतु ही वेळ क्वचितच येते. परंतु बऱ्याचदा कांदा शेतकऱ्यांना रडवतोच. जर आपण महाराष्ट्राचा यावर्षीचा कांदा बाजारपेठेचा विचार केला तर कवडीमोल दराने कांदा विकला जात आहे.
नक्की वाचा:जिरेनियम शेती सेंद्रिय सॉईल मल्टिप्लायर साथीने वाढवा उत्पन्न
या परिस्थितीला बऱ्याचशा प्रमाणात सरकारी धोरणे कारणीभूत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या बाबतीत अनेक वर्षापासून बर्याच प्रकारच्या मागण्या महाराष्ट्रात आहेत. परंतु सरकारचे याबाबतीतली असलेली उदासीनता कायमच दिसून येते.परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बिहार सरकारचा विचार केला तर बिहार सरकारने शेतकऱ्यांना कांदा लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा:Agri News: विदर्भातील संत्रा उत्पादकांवर तीन वर्षापासून संकट,भरपाई मात्र शून्य
कांदा लागवडीसाठी एका हेक्टरवर 49 हजार अनुदान
आपण बिहार राज्य सरकारचा विचार केला तर तेथील फलोत्पादन विभागाने राज्यात कांद्यासह इतर कृषी उत्पादनांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष फलोत्पादन पीक योजना सुरु केली असून या अंतर्गत कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 49 हजार रुपये देण्यात येणार आहे
व ही रक्कम अनुदान अंतर्गत दिली जाणार आहे. यासाठी तसे पाहायला गेले तर 50 टक्के अनुदान निश्चित केले गेले आहे व एक हेक्टरवर 98 हजार रुपये खर्च निश्चित करण्यात आला असून एक हेक्टरसाठी 49 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.
याचा लाभ बिहार राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून यामध्ये बिहार राज्यातील औरंगाबाद,भागल्पुर,दरभंगा,पूर्व आणि पश्चिम चंपारण्य,समस्तीपुर,सीतामढी इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे.
Share your comments