1. बातम्या

Soyabean Rate: सोयाबीनच्या वायदेबंदीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो का फटका? वाचा सविस्तर

सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. आजच्या वर्षी आपल्याला माहित आहेच की,सोयाबीनला खूप चांगल्या प्रमाणात दर मिळाला होता. मागच्या वर्षी देखील महाराष्ट्रमध्ये जास्त पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणचे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले होते. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती देखील या दरवाढीला कारणीभूत होती. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड झाली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
prohibition of futures on soyabean

prohibition of futures on soyabean

सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. आजच्या वर्षी आपल्याला माहित आहेच की,सोयाबीनला खूप चांगल्या प्रमाणात दर मिळाला होता. मागच्या वर्षी देखील महाराष्ट्रमध्ये जास्त पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणचे  सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले होते. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती देखील या दरवाढीला कारणीभूत होती. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड झाली.

नक्की वाचा:सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य रोग व्यवस्थापन सल्ला

 परंतु यावर्षी देखील महाराष्ट्रमध्ये बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पीक खराब झाले आहे. अशा परिस्थितीत देखील सध्या नवीन सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येऊ लागले आहे. परंतु नेमका दर काय राहील? याचा शेतकऱ्यांना कुठलाही प्रकारचा अंदाज येत नाहीये. कारण सोयाबीन वायद्यांवर सरकारने बंदी घातली आहे.

 सोयाबीन वायदे आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी

 आपल्याला माहित आहेच की केंद्र सरकारने खाद्यतेलाचे जे काही दर वाढले होते त्यावर नियंत्रण मिळवता यावी यासाठी डिसेंबर 2021 मध्ये सोयाबीनचे वायद्यांवर बंदी घातली.

नक्की वाचा:यंदा च्या साली सोयाबीनच्या उत्पादनात ५२ टक्के घटीची शक्यता, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट

परंतु तरीदेखील खाद्यतेलाचे दर कमी झाले नाहीत. म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर मोपा अर्थात मस्टर्ड ऑइल प्रोडूसर असोसिएशन ऑफ इंडिया आली द सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ओईल इंडस्ट्रीस अंड ट्रेड संघटनांनी सोयाबीन वायदा वरील बंदी उठवण्याची मागणी केली आहे.

जर आपण सरकारी आकडेवारीचा विचार केला तर  मागच्या वर्षी झालेल्या तेलाच्या दरवाढीला वायदे कारणीभूत नव्हते हे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सोयाबीन वायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दराची माहिती मिळते.

परंतु अजून देखील सोयाबीन वायद्यांवर बंदी असल्यामुळे आणि नवीन सोयाबीन बाजारात देखील येऊ लागले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भविष्यात सोयाबीनच्या दराची स्थिती काय राहील हे माहिती होणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय सोयाबीन उत्पादकांना चांगला दर मिळणार नाही.

यामुळे सरकारने वायद्यावरील बंदी पटकन मागे घ्यावी अशी मागणी देखील उद्योगांनी केली आहे. वायदे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना दराचा नेमका अंदाज येत नाहीये. सरकारने वायदे बंदी उठवली तर  शेतकऱ्यांना नेमके सोयाबीन बाजारपेठेत केव्हा न्यायचे हे शेतकऱ्यांना ठरवायला सोपे होईल.त्यामुळे वायदे सुरू होणे खूप गरजेचे आहे.

नक्की वाचा:नुकसानीमुळे भाजीपाल्याची आवक घटली, भाजीपाल्याचा भावात प्रचंड वाढ

English Summary: fall bid effect on soyabean rate of ban on prohibition of futures Published on: 13 September 2022, 10:51 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters