शिवसेनेचे मोठे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा केला होता. यामुळे आता संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरट जारी करण्यात आले आहेत. यामुळे त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेतील एक मोठे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. यामुळे आता शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी पुरावा नसताना मेधा सोमय्या यांच्यावर आरोप करत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी न्यायालयाने बेल वॉंरट जारी करण्यात आले. आज त्या वॉरंटच्या कॉपी संजय राऊत यांनी ज्या पोलीस स्टेनशनच्या हद्दीत राहतात त्या कांजूर पोलीस स्टेशनमधून त्यांना प्राप्त झाली आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी संजय राऊत यांच्याविरोधात कलम ४९९, ५०० आयपीसी अंतर्गत गुन्ह्यासाठी वॉरंट जारी केले आहे.
भीमाशंकर कारखान्याच्या 18 जागा बिनविरोध, एका अपक्षामुळे लागली निवडणूक
यामुळे किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. याचे परिणाम काय होणार हे येणाऱ्या काळात समजेल. मात्र संजय राऊत हे सध्या भाजप नेत्यांवर जोरदार टीका करत आहेत, तसेच त्यांची ईडीकडून चौकशी देखील सुरू आहे. यामुळे हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
शिंदे सरकारचा अजित पवारांना दे धक्का! घेतला मोठा निर्णय..
फक्त 150 रुपयांमध्ये मिळवा 19 लाख! LIC ची भन्नाट पॉलिसी, जाणून घ्या..
शिंदे सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता मराठवाड्याला पाणी मिळणार
Share your comments