1. बातम्या

भीमाशंकर कारखान्याच्या 18 जागा बिनविरोध, एका अपक्षामुळे लागली निवडणूक

आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखानाच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ३ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहे. यामुळे या कारखान्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीने सत्ता कायम ठेवली आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिली.

18 seats of Bhimashankar factory were elected unopposed

18 seats of Bhimashankar factory were elected unopposed

कोरोना काळानंतर आता सहकारातील निवडणूकांचा कार्यक्रम सुरू झाला असून अनेक कारखाने यामध्ये आहेत. आता आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखानाच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ३ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहे. यामुळे या कारखान्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीने सत्ता कायम ठेवली आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिली.

भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेडे यांच्यासह काही संचालकाची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यामध्ये प्रदीप वळसे पाटील, रामचंद्र ढोबळे, अशोक घुले, शांताराम ऊर्फ कृष्णाजी हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, भगवान बेडे, अंकित जाधव, अरुण चासकर, अक्षय काळे, बाजीराव बारवे, सीताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, प्रिया बाणखेले, पुष्पलता जाधव, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे हे उमेदवारही बिनविरोध निवडणून आले. मात्र तीन जागांवर निवडणूक लागली आहे.

यामध्ये एका एका अपक्षामुळे ही निवडणूक लागली आहे. शिवसेना, भाजप पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली. परंतु एका अपक्ष उमेदवारामुळे शिंगवे-रांजणी गटापुरती निवडणूक लागली आहे. यामुळे याठिकाणी आता निवडणूक होणार आहे. आता संचालकपदाच्या तीन जागांसाठी चार उमेदवार आहेत. याठिकाणी देखील जोरदार लढत होणार आहे.

मोठी बातमी! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा अचानक राजीनामा, चर्चांना उधाण

यामध्ये राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम, बाबासाहेब खालकर, दादा पोखरकर आणि अपक्ष तुकाराम बाबूराव गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अपक्ष उमेदवार तुकाराम गावडे यांनी माघार न घेतल्याने ही निवडणूक लागली आहे. येत्या १७ जुलैला सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणी मंगळवार १९ जुलै रोजी सकाळी ८ नंतर क्रीडासंकुल मंचर येथे होणार आहे. यामध्ये काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता बिअरच ठरणार तुमच्या शरीरासाठी फायदेशीर, संशोधनातून आली फायद्याची माहीती समोर
उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचे मातोश्रीबाहेर निधन
नवीन सरकार आल्यामुळे शेतकऱ्यांचे 50 हजार रखडणार? नव्या सरकारसमोर मोठे आव्हान

English Summary: 18 seats of Bhimashankar factory were elected unopposed due to an independent Published on: 08 July 2022, 10:56 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters