गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अडचणीत आला आहे. राज्यात भाजप सरकार सत्तेत असताना एक मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनाची मोठी चर्चा झाली होती. या आंदोलनाचा पाया अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी घातला होता. आता पुन्हा पुणतांब्यात शेतकरी जमले आहेत.
तसेच त्यांनी आता शेतमालाला भाव मिळत नसल्याने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. यामुळे सोमवारी याबाबत निर्णय होणार आहे. राज्यात उसाचा आणि कांद्याचा प्रश्न पेटला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक शेतकऱ्यांचे ऊस अजूनही तोडले गेले नाहीत. यामुळे त्यांचे नुकसान होत आहे.
त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. 2017 मध्ये राज्यात शेतकरी संप झाला होता. हा संप पुणतांबे या गावातून सुरू झाला होता. यामुळे याची मोठी चर्चा झाली होती. अनेक शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते. आता पुन्हा शेतकरी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पुणतांबे ग्रामपंचायती समोर किसान क्रांतीचे पदाधिकारी, शेतकरी यांची बैठक आज झाली.
भगवंत मान सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले, शेतकऱ्यांची मोठी मागणी केली मान्य...
यामध्ये शिल्लक उसाला एकरी 2 लाख रुपये द्यावे, कांद्याच्या दराबाबत प्रश्न मिटवून योग्य दर द्यावा. तसेच विजेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. यामुळे आता सोमवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच यामध्ये दुधाला प्रतिलीटर दराचा प्रश्न सोडवावा, नाफेड मार्फत कांदा खरेदी केला जावा, उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी लागू करावी, विहिरीसाठी पाच एकराची अट रद्द करावी, आदी मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यामुळे यावरून आता शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा! शेतकऱ्यांना देणार मोफत भाज्या, कडधान्य..
Fish farming; शेतकऱ्यांनो तलावाचा वापर न करता करा मत्सपालन, जाणून घ्या, आहे खूपच फायदेशीर..
नारळाची शेती देखील धोक्यात, 'या' पद्धतीने करा योग्य व्यवस्थापन
Share your comments