पुण्यातील महापालिकेमध्ये नवीन जोडलेल्या गावातील नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे होती.
आता उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे महापालिकेमधून वगळण्यात येणार आहेत. या दोन्ही गावांची एकत्रित नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या दोन गावांसह ११ गावांच्या विकास आराखड्याचे काम पालिकेकडून सुरू आहे.
येत्या दोन आठवड्यांत यासंदर्भातील आदेश काढण्यात येणार आहे. याबाबत काम अंतिम टप्प्यात आले आहे, तसेच पालिकेच्या वतीने या गावांमध्ये तीन टीपी स्कीमदेखील राबविण्यात येत आहे.
राज्यात 5 हजार बायोगॅस उभारणार, अनुदानात झाली वाढ
वांमध्ये अद्याप पायाभूत सुविधा दिलेल्या नसताना मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात येत असल्याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.
शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे महापालिका सुविधा देत नसल्याने ही दोन गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.पुणे महापालिका भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका ठरली होती.
राज्यात 5 हजार बायोगॅस उभारणार, अनुदानात झाली वाढ
पण आता ही दोन गावे वगळण्यात येणार आहेत. या दोन्ही गावांची लोकसंख्या अडीच लाख आहे. त्यामुळे पालिकेचे क्षेत्रफळ कमी होणार आहे. यामुळे येथील लोकांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या;
Crop Insurance: बातमी कामाची! गहू, हरभऱ्याच्या पीकविमा अर्जासाठी गुरुवारपर्यंत मुदत
शेतकऱ्यांनो आता सुरु करा पशुखाद्य बनवण्याचा व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आता वाढतच जाणार आहे..
शेतकऱ्यांनो कमी वेळेत लाखोंची कमाईसाठी डुक्कर पालनाचा व्यवसाय फायदेशीर, वाचा सविस्तर
Share your comments