1. बातम्या

Crop Insurance: बातमी कामाची! गहू, हरभऱ्याच्या पीकविमा अर्जासाठी गुरुवारपर्यंत मुदत

यावर्षी रब्बी हंगामात (Rabi Season) पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गहू आणि हरभरा या पिकांसाठी गुरुवार १५ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना विमा अर्ज (Crop Insurance) दाखल करता येतील, अशी माहिती समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आता तरी शेतकऱ्यांनी ही कामे उरकावीत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
crop insurance applications

crop insurance applications

यावर्षी रब्बी हंगामात (Rabi Season) पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गहू आणि हरभरा या पिकांसाठी गुरुवार १५ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना विमा अर्ज (Crop Insurance) दाखल करता येतील, अशी माहिती समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आता तरी शेतकऱ्यांनी ही कामे उरकावीत.

याबाबत शेतकरी अनेकदा मागणी करत आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. यामुळे शेतजऱ्यांना याबाबत माहिती असणे गरजेचे आहे

दरम्यान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यांसारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे.
यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

ऊस शेती परवडणार! पठ्याने काढले 50 गुंठ्यांत थेट 120 टन ऊसाचे उत्पादन, वाचा शेतकऱ्याच व्यवस्थापन

शेतकरी अर्ज, विमा हप्ता सामाईक सुविधा केंद्रामार्फत (सीएससी) ऑनलाइन पद्धतीने निःशुल्क भरू शकतात. परभणी जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीकडून राबविण्यात येत आहे. प्रतिहेक्टरी विमाहप्ता दर गहू बागायती ६३० रुपये, हरभरा पिकासाठी ५६२ रुपये ५० पैसे, तर उन्हाळी भुईमुगासाठी ६४४ रुपये ५७ पैसे आहे.

राज्यात 5 हजार बायोगॅस उभारणार, अनुदानात झाली वाढ

योजनेत सहभागी होण्यासाठीची कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी अंतिम मुदत गहू बागायत आणि हरभरा या पिकासाठी गुरुवार (ता. १५)पर्यंत, तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२३ ही आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रब्बी हंगामातील सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्‍चित करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो आता सुरु करा पशुखाद्य बनवण्याचा व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आता वाढतच जाणार आहे..
शेतकऱ्यांनो कमी वेळेत लाखोंची कमाईसाठी डुक्कर पालनाचा व्यवसाय फायदेशीर, वाचा सविस्तर
राज्यात 5 हजार बायोगॅस उभारणार, अनुदानात झाली वाढ

English Summary: Deadline till Thursday crop insurance applications wheat, gram Published on: 07 December 2022, 12:57 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters