देशात सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे. यामुळे सरकार कठोर निर्णय घेत आहे. असे असताना आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम केले आहेत. यामुळे आता 1 जुलैपासून कुणी सिंगल यूज प्लास्टिक विकताना, वापरताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे आता सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे. याचा वापर बंद करून देशासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हा निर्णय झाल्यानंतर मात्र देशातील सर्वात मोठ्या दुग्ध समूह अमूलने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्याची विनंती सरकारला केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक देशातील शेतकऱ्यांवर आणि दुधाच्या वापरावर नकारात्मक परिणाम होईल, असे अमूलने म्हटले आहे. यामुळे आता यावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे असताना यावर सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 1 जुलैपासून एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी येणार असल्याचे मानले जात आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, कोणत्याही दुकानात सिंगल यूज प्लास्टिक वापरले गेल्यास, त्या दुकानाचे ट्रेड लायसन्स रद्द करण्यात येईल. या नंतर हे लायसन्स पुन्हा मिळविण्यासाठी दुकानदाराला दंड भरून पुन्हा अर्ज करावा लागेल. यामुळे दुकानदारांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
लसणाची एक पाकळी झोपताना उशीखाली नक्की ठेवा, आयुष्यात होतील मोठे बदल..
सरकारने प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलली तर देशातील 100 दशलक्ष दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. असे अमूलचे म्हणणे आहे. अमूल, फ्रूटी, पेप्सिको, कोका-कोला मधील बहुतेक पेये प्लास्टिकच्या स्ट्रॉसह पॅक करून ग्राहकांना दिली जातात. यामुळे या कंपन्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता याला काय पर्याय उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
कार-बाईक चालवणाऱ्यांची होणार दिवाळी! नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांनो थांबा!! राज्यात केवळ एक टक्केच पेरणी, पावसाअभावी पेरण्या थांबल्या...
किसानपुत्रांनी पाळला काळा दिवस, घरावर काळे झेंडे लावून केला सरकारचा निषेध
Share your comments