अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे २५० एकर जमिनीवर 'गोट ब्रिडींग फार्म' तयार केला आहे. आता त्याच ठिकाणी रामटेक तालुक्यात गोट ब्रिडींग फार्म तयार करण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक शेतकरी कुटुंबाला १ शेळी मोफत देण्याची योजनादेखील आखण्यात आली आहे, असे वक्तव्य पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी शेतकरी उत्पादन कंपनीच्या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात केले आहे.
या कार्यशाळेचे आयोजन स्व. वसंतराव नाईक सभागृह (वनामती) येथे रविवारी करण्यात आले होते. या कार्यशाळेत बोलताना मंत्री सुनील केदार म्हणाले, की ग्रामीण अर्थव्यवस्था ही विस्कळित झाली असून तिचे बळकटीकरण करणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेती उद्योगावर भर देत शेळी आणि दुधाळ जनावरांच्या जोड व्यवसायावर अधिक लक्ष दिले पाहिजे.
या गोष्टींवर चिंतनआणि मनन करण्याची नितांत गरज आहे असे वक्तव्य देखील त्यांनी केले. जिल्हा परिषदेद्वारे शेळी गट आणि दुधाळ जनावरे वाटप कार्यक्रम ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे आणि जर हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाला तर तो राज्यातदेखील राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून शेतकरी उत्पादक कंपनीला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळणे गरजेचं असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सांगितले.
तसेच आधुनिक काळात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे या कार्यशाळेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शिवाय कृषी सभापतींनी नाशिक येथील शेतकरी उत्पादक कंपनीला भेट द्यावी आणि तेथील कार्यपद्धती जाणून घ्यावी आणि त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
बातमी कामाची: सोलर पंप योजनेचा आजच्या घ्या लाभ; 'या' जिल्ह्यात नोंदणी कार्य सुरु
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, समाजकल्याण सभापती नेमावली माटे, शेतकरी उत्पादक कंपनीचे मार्गदर्शक दीपक झंवर, अमिताभ मेश्राम, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, महाराष्ट्र सहकार विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, कृषी विकास अधिकारी जयंत कऊटकर, किशोर बोराटणे यांनी देखील उपस्थिती दर्शवली.
महत्वाच्या बातम्या
बातमी कामाची! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो कांदा बिहार केरळमध्ये विका, व्हाल मालामाल...
सावधान..! तापमान वाढीची धक्कदायक कारणे आली समोर; दुर्लक्ष केल्यास...
Share your comments