बऱ्याचदा काळजी घेऊन देखील शेतातील उत्पादनात घट होत असते. घट होण्यापाठीमागे बरीच कारणे असतात. सध्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा वापर चांगलाच महागात पडला आहे. उन्हाळी सोयाबीन पेरणी करताना बोगस बियाणे वापरल्यामुळे बऱ्याच नुकसानीला शेतकरी सामोरे जात आहेत. बोगस बियाणांमुळे त्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
या परिस्थितीचे गांभीर्य पाहता नागपूर जिल्ह्यात खबरदारी म्हणून पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात बोलताना मंत्री सुनील केदार म्हणाले, "शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे तसेच खतांचा पुरवठा मुबलक करावा. याबाबत कोणतीही तक्रार येता कामा नये. आणि जे बोगस बियाणांचे वाटप करत आहेत त्या कृषी केंद्रावर धाड टाकून कारवाई सक्त कारवाई केली जाईल."
हे खरीप पूर्व आढावा बैठकीचे आयोजन होते. तसेच "ज्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही, कृषी विभागाने यात लक्ष घालून अशा शेतकऱ्यांची यादी तयार करावी व पंजाबराव कृषी विद्यापीठास पाठवावे, याची महिनाभरात अंमलबजावणी केली जाईल. व सगळी कार्यवाही करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येणार असल्याचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
कापूस व सोयाबिन पिकांचे क्षेत्र मोठया प्रमाणावर आहे, शेतकऱ्यांनी यासोबतच मका व ज्वारी या पिकांच्या क्षेत्र वाढीवरदेखील भर दयावा. कृषी विभागाने याबाबत दखल घेत त्याचे पूर्वनियोजन करुन ग्रामीण भागात पत्रके वाटून जनजागृती करावी. वस्तुस्थितीवर आधारित पिकांची माहिती देऊन पिकांचे अर्थशास्त्र सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजावून सांगा. बोगस बियाणे देणाऱ्या कृषी केंद्रांवर सक्त कारवाई करा.
खत व किटकनाशकांची कमतरता पडणार नाही याकडे लक्ष द्या. त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असेही मंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केले. दिवसेंदिवस जमीनीचा पोत खराब होत जाऊन उत्पादकता कमी होत आहेत. त्यामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावर जावून मार्गदर्शन करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
तसेच तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक आणि संपर्क दुरध्वनीची माहिती पोहचली पाहिजे यासाठी कृषी विभागाच्या योजनांची जनजागृती शिबीराचे कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबाग उत्पादन वाढीसाठी संत्रा, मोसंबीसह व्हिएन आर पेरुची लागवड करण्यास प्राधान्य दयावे. यातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. असेही ते म्हणाले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी खरीप पुर्व हंगामाबाबत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात खरीप हंगामात चार मुख्यपिक घेण्यात येते.
सुमारे 4 लाख हेक्टर 77 हजार क्षेत्रात कापसाचे उत्पन्न लागवड तर 1 लाख 57 हेक्टर इतक्या क्षेत्रात सोयाबिनचे उत्पन्न घेण्यात येते. शिवाय तांदूळ 88 हजार 905 हेक्टर क्षेत्रावर तर तुर 83 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येते. यासह मका आणि ज्वारीचे उत्पन्नदेखील घेतले जाते. विभागाकडे मुबलक खतांचा पुरवठा असल्याचं त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात खरीप हंगामात चार मुख्यपिक घेण्यात येते. साधारण 4 लाख हेक्टर 77 हजार क्षेत्र कापूस तर 1 लाख 57 हेक्टर क्षेत्रात सोयाबिनचे उत्पन्न घेण्यात येते तर तांदुळ 88हजार 905 हेक्टर क्षेत्र व तुर 83 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येते. यासोबत मका व ज्वारीचे उत्पन्न घेण्यात येते. विभागाकडे मुबलक खतांचा पुरवठा आहे, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
खजूर शेती: खजुराचे एक झाड देते 50 हजार रुपयांचे उत्पन्न, होऊ शकता काही वर्षात करोडपती
केंद्र सरकारच आहे शेतकऱ्यांचा शत्रू? आता साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी सुरू
Share your comments