1. बातम्या

जोरदार हिवाळा सहन करण्यास तयार व्हा, दिल्ली सहित या राज्यांमध्ये पारा घसरणार

थंडी आणि धुक्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे , भारतीय हवामानशास्त्र विभागाने ताज्या अद्ययावत केलेल्या अहवालात म्हटले आहे की, पारा पूर्णपणे घसरणार असल्याने येत्या तीन दिवस खूप थंडी पडणार आहेत, जरी धुक्यात घट होईल. तरी राजधानी दिल्लीत आजही दाट धुके पहाटे पहावयास येईल. आज पहाटे साडेपाच वाजता पालम आणि सफदरजंग येथे अनुक्रमे 9.8 आणि 8.8 डिग्री तापमान पहावयास मिळाले ,तर दोन्ही ठिकाणी 500 मीटरची दृश्यमानता दिसून आली.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
weather

पूर्व, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि चंदीगडमध्ये घनदाट धुके पसरत असताना या महिन्यात थंड हवामानाचा इशारा इतर राज्यातही दिला आहे.दिल्लीतच नव्हे तर उत्तर भारतातील बहुतेक सर्व राज्यांमध्ये खोऱ्यात थंडी आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. धुक्यामुळे गाड्यांच्या हालचालीवरही परिणाम होत आहे, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील खोऱ्यात थंड वारे वाहत आहेत .

आपत्ती व्यवस्थापन विभागाने जम्मू-काश्मीरमधील पुंछ, राजौरी, रामबन, डोडा, किश्तवार, अनंतनाग, कुलगाम, बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा, गांदरबल आणि कारगिल जिल्ह्यांच्या वरच्या भागांमध्ये हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापनाने या संदर्भात सतर्कतेचा इशारा देत डोंगराळ भागात जाण्यास लोकांना मनाई केली तसेच खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की यावेळी काश्मीरमध्ये चिल्लई-बाचा (बेबी कोल्ड) चा काळ सुरू झाला आहे, ज्यामध्ये थंडी थोडी कमी होते पण तरीही काश्मिरींना थंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या तीन दिवसानंतर हवामान बदलेल असा इशारा देण्यात आला आहे .स्कायमेटच्या मते, उत्तर भारताला थंडीचा सामना करावा लागणार आहे. पंजाबमधील अमृतसर, जालंधर, पठाणकोट, शहीद भगतसिंग नगर, लुधियाना, पटियाला, बरनाळा ते चूरू, गंगानगर मध्ये थंड हवामानाचा जास्त परिणाम दिसून येईल .

English Summary: Be prepared to endure severe winters, mercury will drop in these states including Delhi Published on: 25 January 2021, 01:29 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters