शेतकर्यांना त्यांच्या पिकांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी नेहमी विविध प्रकारची कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करावी लागते. त्यामुळे पिकाचे संरक्षण होते आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. असे असले तरी शेतकऱ्यांनी फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मुत्यू
नुकतेच दोन-तीन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि सिन्नर येथे औषधांच्या फवारणीमुळे दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे. शेतकरी सतर्क नसल्याने ही घटना घडली. हे औषध अधिक विषारी असल्याने शेतकऱ्यांच्या नाकातोंडात औषध शिरले. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
आजूबाजूच्या पंचक्रोशीत मोठी हळहळ व्यक्त केली जात असून याबाबत कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. शेतकरी बांधवांनी औषध फवारणी करताना निष्काळजीपणा करू नये.
महत्त्वाच्या बातम्या :
Milk Rate : शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! दूध दरात तब्बल 'इतकी' वाढ
खुशखबर! शेतकऱ्यांचा शेतीमाल बांधावरून थेट सातासमुद्रापार जाणार, असा घ्या योजनेचा लाभ..!
फवारणी करताना काळजी घ्या
१. पिकांवर कीटकनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके इत्यादी फवारणी करताना आवश्यक ते द्रावण तयार करताना मुलांना त्यापासून दूर ठेवावे.
२. हानिकारक औषधांपासून संरक्षण करण्यासाठी डोळ्यांचे गॉगल, फेस मास्क, हातमोजे, संपूर्ण शरीर झाकणे आणि शूज घाला. जेणेकरून औषध फवारणी करताना उडणारे जिन्नस अंगावर येऊ नये.
३. फवारणी करताना नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
४. जास्त ऊन आणि जोराचा वारा असल्यास फवारणी टाळावी.
५. एवढेच नाही तर औषध फवारणी करताना गुटखा, तंबाखू आदी औषधांचे सेवन टाळावे.
६. फवारणीनंतर उरलेली कीटकनाशके किंवा इतर कीटकनाशके योग्य प्रकारे साठवून ठेवावीत किंवा त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
७. नद्या, कालवे, तलावात कधीही औषध फवारणी करू नये. यामुळे माणसांचे तसेच पाळीव प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
धरणग्रस्तांना मिळणार हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
सोयाबीनला अच्छे दिन..! दरात झाली 'इतकी' वाढ; शेतकऱ्यांना होणार फायदा
Share your comments