कोलवड: महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठअंतर्गत असणाऱ्या सर्व कृषी पदवी विद्यार्थी सातव्या सत्रात प्रत्यक्ष जाउन मार्गदर्शन करीत असतात.ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव व कृषी औद्यागिक जोड (रावे) कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरातील गावात सहा महिने हा उपक्रम राबवयाचा
असतो.बुलढाणा जिल्ह्यातील आदर्श ग्राम पुरस्कार मिळालेल्या कोलवड या गावांमध्ये रावे म्हणजेच ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या अंतर्गत कृषी महाविद्यालय, अकोला च्या विद्यार्थिनींनी प्रत्येक घरात बनवल्या जाणाऱ्या दुधाच्या आवडत्या बासुंदीला प्रमाणित पद्धतीने बनवून ग्रामवासीयांना त्याचा आस्वाद चाखविला . गावांमधील असलेल्या
दूध डेयरी मधून दूध घेऊन त्यांनी ही बासुंदी चुलीवर बनवली.He made this basundi on the stove by taking milk from the milk dairy.त्याचा आस्वाद उपस्थित 12 गावकऱ्यांनी घेतला.यामध्ये कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा चे डॉ. सी.पी जायभाये सर, कृषी महाविद्यालय, अकोला (डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. के. नागरे सर व सोबतच संबंधित विद्यार्थ्यांचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कहाते
सर ,धुळे सर, डॉ.गायकवाड मॅडम व डॉ.अपोतिकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थिनी श्रद्धा कटरे ,ऋतुजा चौखे, धनश्री व्यवहारे ,अमृता बरडे,रिया ढोक , व प्रेरणा गव्हाळे यांनी बासुंदी मिळून बनवली त्यात त्यांना शेजारील काकूंनी घरातील गंज,चमचा,चुल इत्यादी साहित्याची मदत केली. गावकऱ्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments