शेतकरी बंधू शेती व्यवसायासोबतच शेती पूरक व्यवसाय करण्याकडे प्राधान्य देत असतात. पशुपालनासारख्या व्यवसायातून शेतकऱ्यांना बराच आर्थिक फायदा होत असतो. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे बरेच नुकसान झाले आहे. मागील वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात ऑगस्ट - सप्टेंबर या कालावधीदरम्यान बहुतांशी भागात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. त्यावेळी अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे वीज पडून, पुरात वाहून जाऊन अनेक पशु दगावले आहेत. पशु दगावल्याचे दुःख एकीकडे तर त्यातून झालेली आर्थिक हानी एकीकडे. या भागात जवळजवळ ५९ गावातील तब्बल २२० पशु दगावल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले होते. मात्र अजूनही पशुपालकांना याची नुकसानभरपाई मिळाली नाही.
मागील वर्षी सुरुवातीला या जिल्ह्यात हलक्या पावसाला सुरुवात झाली मात्र कालांतराने याच पावसाने आक्रमक रूप धारण केले. ऑगस्ट - सप्टेंबर या महिन्यात बराच पाऊस झाला. बहुतांश मंडळात अतिवृष्टी झाली तर काही भागात ढगफुटी सदृश अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र याचा सगळ्यात मोठा फटका हा नदीकाठच्या गावांना बसला.
कधी पुराच्या पाण्यात वाहून जाऊन तर कधी वीज अंगावर पडून जनावरांचा मृत्यू झाला. केवळ दोन महिन्याच्या कालावधीत २२० लहान मोठे पशु दगावले. याबाबतचे पंचनामे होऊनही अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जिल्हा प्रशासनाकडे पशु दगावल्याची नोंद आहे. प्रशासनाने याची दखल घेत शासनाकडे ४४ लाख ६२ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. मात्र अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही.
नायजेरियन डॉर्फ(बटू)शेळीची सर्वात लहान जात शेळी पालकांना बनवते मालामाल, जाणून घेऊ सविस्तर माहिती
पशु दगावल्यास शासनाकडून मिळते मदत
गाय, म्हैस दगावल्यास प्रत्येकी ३० हजार रुपये तर शेळी व बोकड दगावल्यास ३ हजार रुपये, बैल ठार झाल्यास २५ हजार रुपयांची मदत मिळते. वासरू,खोडांचा मृत्यू झाला तर १६ हजार रुपयांची शासनाकडून मदत मिळते.
महत्वाच्या बातम्या:
शेतकरी आणि अस्वलाची कडवी झुंज; दोघेही रक्तबंबाळ होऊन...
विदर्भावर विजेचे संकट; एकाच दिवशी घेतला आठ शेतकऱ्यांचा बळी
Share your comments