1. कृषीपीडिया

मातीविना शेती! माहितीय का तुम्हाला हायड्रोपोनिक्स शेती? नाही तर मग जाणुन घ्या.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
hydroponics farming

hydroponics farming

शेती नाव ऐकलं की सर्वप्रथम आपल्याला आठवत जमीन, आपली धरणीमाता, मग विचार करतो की ही जमीन कशी आहे पडीत आहे की बागायती आहे. अहो! पण आता ह्या गोष्टी काळबाह्य होताना दिसत आहेत खरंच आज आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत मातीविना शेती करण्याचे नवीन शेतीतंत्र ते म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती (hydroponics farming). मागच्या आठवड्यात आम्ही आपणांस अक्वापोनिक्स शेतीविषयी सांगितलं होत जर तुम्ही त्या विषयी वाचलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करा

(https://marathi.krishijagran.com/horticulture/know-about-aeroponics-farming/ )

ह्या आधुनिक युगात शेतीसाठी जमीन, माती, खुप सारे पाणी ह्या सर्व्या गोष्टींची गरज भासत सुद्धा नाही. ह्या आधुनिक शेतीच्या युगात नवनवीन तंत्रज्ञानाच्या समावेषाणे शेती अधिकच सोपी झाली आहे.आता आपण शेती घराच्या टेरेस पासुन तर घराच्या अंगणात देखील शेती करू शकतात ह्याच प्रकाराची शेती आहे हायड्रोपोनिक्स शेती, ह्या नवीन शेतीतंत्रात मातीची गरज नसते ह्या पद्धतीने शेती करून बळीराजा फक्त नावालाच राजा राहणार नाही तर तो खरा खुरा राजा बनुन चांगली कमाई करू शकतो.

 

असं सांगितलं जात की हायड्रोपोनिक्स शेती ही आजपासून नाही तर शेकडो वर्षांपासून केली जात आहे. ग्रीन अँड व्हायबरंट नामक वेबसाईट अनुसार 600 इसा पूर्व बेबोलीन मध्ये हँगिंग गार्डन (hanging garden of babylon) बघायला मिळत होते, ज्यात मातीविना वनस्पतीची लागवड केली जात असे. 1200 शतकात किंवा त्यांच्या शेवटी मार्को पोलो चिनच्या यात्रेवर असताना त्याने पाण्यावर केली जाणारी शेती बघितली होती हे एक उत्तम उदाहरण आपल्या नजरेसमोर आहे.

 मातीविना छोट्याश्या जागेत जलद गतीने शेती करण्याची ही एक चांगली पद्धत आहे,यामध्ये पाण्याची गरज पण टेकनिकचा सुयोग्य वापर केल्याने कमी होऊन जाते. असे असले तरी सुरवातीला मात्र ह्या प्रकारची शेती करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांवर खर्च करावा लागतो आणि ह्या खर्चसोबतच ट्रैनिंगची देखील आवश्यकता असते. आणि सर्वात महत्वाची बाब मम्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी या तंत्राचा वापर करून शेती करणार आहात तिथे विजेची समस्या नकोय कारण पाणी जर पिकांना वेळेवर मिळाले नाही आणि तापमाणात गडबड झाली तर काही तासातच पिक मरू शकते.

 

 

 

कशी काम करते ही हायड्रोपोनिक्स टेक्निक (how works hydroponic farming)

या तंत्रात भाज्या फक्त पाण्याद्वारेच उगवल्या जातात. यामध्ये, पौष्टिक पाणी पाईपमध्ये वाहते, ज्यावर झाडे लावली जातात.  वनस्पतींची मुळे पाण्यातून त्यांचे पोषण घेतात.  बाजारात हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाची अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत. हे तंत्र खूप कमी पाणी वापरते. त्यासाठी पॅरालाइट आणि कॉकपिट आवश्यक आहे.

कशी बरं करणार शेती?

या तंत्रात पॅरालाईट आणि कोकोपिट मिसळले जातात आणि एका लहान बॉक्समध्ये ठेवले जातात. एकदा कंटेनर कोकोपिट आणि पॅरालाइटच्या मिश्रणाने भरला की, तो चार ते पाच वर्षांपर्यंत वापरता येतो. या बॉक्समध्ये आधी बिया पेरल्या जातात. मग जेव्हा त्यात झाडे बाहेर येतात, तेव्हा हे बॉक्स पाईपच्या वर बनवलेल्या छिद्रांमध्ये ठेवले जातात, ज्यात पौष्टिक पाणी वाहते.  गंमत म्हणजे त्यात काम करताना तुमचे हात गलिच्छ होत नाहीत.  बॉक्सच्या तळाशी एक छिद्र केले जाते. या तंत्रात, आपण आपल्या जागेच्या उपलब्धतेनुसार मॉडेल तयार करू शकता.आता या तंत्राबद्दल बोलूया, यासाठी एक साधे उदाहरण आहे, जर तुम्ही कधी तुमच्या घरात किंवा खोलीत एका काचेच्या किंवा पाण्याने भरलेल्या बाटलीत रोपाची एक फांदी ठेवली असेल, तर तुम्ही पाहिले असेल की काही दिवसांनी त्यात मुळे बाहेर येतात आणि हळूहळू ती वनस्पती वाढू लागते.

 

बऱ्याचदा आपण विचार करतो की झाडे वाढण्यासाठी आणि वाढवण्यासाठी खत, माती, पाणी आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे.  पण वास्तव हे आहे की पीक उत्पादनासाठी फक्त तीन गोष्टींची गरज आहे - पाणी, पोषक आणि अन्न.हे पाहिले गेले आहे की या तंत्राने झाडे जमिनीतील वनस्पतींपेक्षा 20-30% चांगली वाढतात. याचे कारण झाडांना थेट पाण्यातून पोषण मिळते आणि त्यासाठी त्यांना जमिनीतुन पोषक तत्वे मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. तसेच, जमिनीत वाढणाऱ्या विविध तणांमुळे पिकाला इजा होत नाही.

 

 पिकाचा दर्जा चांगला राहतो

हायड्रोपोनिक्स तंत्राने शेती करणारे शेतकरी सांगतात की, या तंत्राने भाजीपाला पिकवल्याने भाज्यांची गुणवत्ता खूप चांगली राहते. तसेच, त्यांना पोषणाची कमतरता नसते कारण ते पौष्टिक अन्न शोषून वाढतात. या तंत्रात माती वापरली जात नाही, त्यामुळे किडिंचा आणि रोगांचा प्रादुर्भाव त्यात नसल्यासारखाचा आहे. तसेच, पिकाचे पोषण मूल्य देखील खूप चांगले असते. कोथिंबिरीचे उदाहरण जर आपण घेतले तर असे लक्षात येईल की, शेतकरी जमिनीची लागवड करून वर्षातून सहा वेळा कोथिंबीर पिकवू शकतात. पण या तंत्राने आपण कोथिंबीर एका वर्षात 15 ते 16 वेळा काढू शकता.

 या पद्धतीने शेती करून आपण किती कमवाल?

जर कोणी त्याच्या घरातून या तंत्राचा वापर केला आणि भाजीपाला तयार केला तर तो एका महिन्यात 30-40 हजार रुपये कमवेल.  जर कोणी एक एकरमध्ये हे तंत्र वापरून शेती केली तर चार ते पाच लाख रुपये मिळवू शकतो. नापीक जमिनीवरही याची लागवड करता येते. या तंत्रसाठी किमान 25 हजार ते एक लाख रुपयांच्या खर्चासह सुरूवात करता येईल.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters