1. बातम्या

महाराष्ट्रात ५ ते ७ दिवस उशिराने होणार मोसमी पावसाचे आगमन

नवी दिल्ली - भारतीय हवामानशास्त्र विभागाने नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार केरळच्या किनाऱ्यावर यंदा मॉन्सून उशिराने दाखल होणार आहे.

KJ Staff
KJ Staff

 

नवी दिल्ली -  भारतीय हवामानशास्त्र विभागाने नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज शुक्रवारी जाहीर केला.  त्यानुसार  केरळच्या किनाऱ्यावर यंदा मॉन्सून उशिराने दाखल होणार आहे.   वेळेच्या ४ दिवस उशिराने येणार असून मॉन्सून  ५ जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  यापूर्वी मान्सून वेळेवर दाखल होईल असे सांगितले जात होते.  भारतीय उपखंडात दक्षिण अंदमान समुद्रात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.

मोसमी वारे आता वायव्य बंगालच्या उपसागराकडे सरकत आहेत.  दीर्घकाळीन सरासरी वेळेनुसार मॉन्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो परंतु यंदा मॉन्सूनचे आगमन चार दिवस उशिराने होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहिर केले आहे.  मान्सूनच्या सुधारित वेळापत्रकानुसार, अंदमान समुद्रात नैऋत्य मोसमी वारे २२ मेपर्यंत धडकू शकते.  मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर देशात दाखल झाल्याचे जाहीर केले जाते.  त्यानंतर हवामानात वेगाने बदल होऊन उन्हाळा ऋतूचे पावसाळा ऋतूमध्ये रुपांतरप होत असते.  दरम्यान यंदाच्या मॉन्सूनमध्ये शंभर टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने आपल्या प्राथमिक अंदाजात म्हटले आहे.  मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीला एल-निनो स्थिती सर्वसामान्य राहणार असून शेवटच्या टप्प्यात एल-निनो स्थिती निर्माण होण्याचे संकते आहेत. 

मागील काही वर्षांच्या निरीक्षणानुसार अंदमान समुद्रावर मान्सून सक्रियतेचा आणि केरळात मान्सून दाखल होण्यात फारसा संंबंध नाही.  मागील वर्षी नैऋत्य मोसमी वारे ६ जूनला केरळात दाखल होतील असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात ८ जूनला तेथे मान्सूनचे आगमन झाले होते.  सर्वसाधारणपणे १५ जुलैपर्यंत मान्सून पूर्ण देश व्यापतो. मात्र गतवर्षी १९ जुलैला मान्सून देशभर पोहोचला होता.  हवामान विभागानुसार १६ वर्षांनंतर प्रथमच मे इतका थंड राहील. यापूर्वी २००४ मध्ये दुसऱ्या आठवड्यातील पावसाने मे महिन्यात पारा घसरला होता.  पश्चिमी विक्षोभामुळे यंदा हवामानात बदल दिसून येत आहेत.  मागील ३७ वर्षांच्या हवामानविषयक आकडेवारीच्या विश्लेषणावरून मध्य भारतात मान्सून ७-८ दिवस उशिराने येत आहे. 

English Summary: Arrival of monsoon rains in Maharashtra 5 to 7 days late - IMD forecast Published on: 16 May 2020, 02:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters