बीड जिल्ह्यातील माजल गावातील तालखेड भागात दिवसाढवळ्या ऊसतोड मजुरांना मारहाण करून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सोमवारी झालेल्या या धक्कादायक प्रकारात एक निष्पाप रिक्षा चालकदेखील गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी लगेचच तपासाला सुरुवात केली. आणि 12 तासांच्या आताच गोळीबार करणाऱ्या आरोपीवर कारवाई केली.
संतोष गायकवाड हा या घटनेचा मुख्य आरोपी आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संबधित आरोपी कुख्यात असून त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. सोमवारी जेव्हा आरोपीने ऊसतोड मजुरांवर गोळीबार केला तेंव्हा संतप्त जमावाने त्या गुंडाला चांगलाच चोप दिला. मात्र आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
त्याला सध्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून धारदार शस्त्रांसह गावठी पिस्तुल तसेच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. या घटनेनंतर मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
मोदी सरकारचा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात, वाचा नवे दर
पाच आरोपी पण तीन अटकेत:
मुख्य आरोपी संतोष गायकवाड याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. मात्र डिसेंबर 2021 ला तो बाहेर आला. नंतर 307 चा गुन्हा त्याच्यावर लागला होता त्यासाठी पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. सोमवारच्या घटनेनंतर नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आहे. शिवाय आता पोलिसांनीदेखील त्याला जेरबंद केले आहे.
मुख्य आरोपीसह अजून चार जण यात सामील असल्याने पोलिसांनी त्या साथीदारांनाही अटक केली. ऊस मजुरांवर गोळीबार केल्यानंतर तिथून त्यांनी पळ काढला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच जीपमधून गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतूस, दोन कत्त्या, एक चाकू अशी धारदार शस्त्रे सापडली. या घटनेनंतर मात्र नागरिकांमध्ये दहशद निर्माण झाली आहे.
पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. या आरोपींचे गोळीबार करण्याचे कारण नक्की काय होते हे अजूनही कळाले नाही. मात्र आमची तपासणी चालू आहे. या तपासणीतून खरे कारण लवकरच समोर येईल असा विश्वास पंकज देशमुख यांनी दाखवला.
महत्वाच्या बातम्या:
मराठमोळ्या शेतकऱ्यांनी करून दाखवले; आता चाळीतील खराब कांद्याची चिंता मिटली
पावसाने दिली शेतकऱ्यांची साथ आणि शेतकऱ्यांनी केला पेरणीचा श्रीगणेशा
Share your comments